फॅमिली मॅन 2 चे पोस्टर व्हायरल, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली 

The-Famile-Man 2
The-Famile-Man 2

मुंबई - फार कमी भारतीय वेब सिरीज अशा आहेत ज्या प्रेक्षकांना आवडल्या आहेत. त्याला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली आहे. त्यात मनोज वाजपेयींच्या द फॅमिली मॅनचा समावेश करावा लागेल. कमी कालावधीत मोठी लोकप्रियता या मालिकेच्या वाट्याला आहे. आता तिचा 2 रा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज वाजपेयीने या मालिकेचा 2 भाग ही लवकरच प्रसिध्द करणार असल्याचे सांगितले होते. नुकताच द फॅमिली मॅन 2 च्या वेबसिरिजचा पोस्टर लूक प्रसिद्ध झाला आहे. 

अँमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यात समंथा अक्कीनेनी झळकणार आहे. सध्या सोशल मीडियावर जो या मालिकेचा फोटो व्हायरल झाला आहे त्याची सगळीकडे चर्चा आहे. अनेक महिन्यापासून द फॅमिली मॅनच्या पुढच्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. 2021 मध्ये प्रसिध्द होणाऱ्या या मालिकेच्या नव्या पोस्टर सोबत एक टाइम बॉंबचा फोटो दाखविण्यात आला आहे. याचे कारण जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी याने या मालिकेत श्रीकांत तिवारी यांची भूमिका केली होती. तर जे के तळपदे यांनी शरिब हाश्मीचे पात्र रंगवले होते. ते दोघेही आता एका वेगळ्या सिक्रेट मिशनसाठी बाहेर पडले आहेत. मान, सन्मान, प्रतिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित करणारी नोकरी. ती प्रामाणिकपणे करणारा अधिकारी श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा मोठा धमाका करण्यासाठी तयार झाले आहेत.

एक बाप, पती आणि एक अधिकारी, या नात्याने दरवेळी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका साकारव्या लागणाऱ्या मनोज वाजपेयी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंद केले होते. या मालिकेत आणखी अभिनेता शरद केळकरही दिसणार आहे. या मालिकेत आता दाक्षिणात्य अभिनेता समंथा अक्कीनेनी याने पुनरागमन केले आहे. एका डिजिटल प्लॅटफॉर्ममधून पदार्पण करणाऱ्या समंथाचा नवा अवतार प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. 

द फॅमिली मॅन एक थ्रिलर ऍक्शन वेबसिरिज असून या मालिकेच्या पहिल्या भागाला मोठी पसंती मिळाली होती. ही कथा श्रीकांत तिवारी नावाच्या एका राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्याची आहे. त्याने आपली खरी ओळख न दाखवता देशासाठी प्राणाची बाजी लावली आहे. ही जेवढी एका अधिकाऱ्याची गोष्ट आहे तितकीच ती मध्यम वर्गीय व्यक्तीची न सांगता येणारी व्यथाही आहे. बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या प्रकारची वळण घेणारी राजकीय धोरणे, यांच्यावर व्यंगात्मक भाष्य या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com