Kedar Shinde: चांगलाच उद्धार केलाय आमचा.. नाटक संपलं आणि भरतच्या आई-वडिलांनी केदारची शाळा लावली..

केदार म्हणाले, भरतचे आई-वडील बॅकस्टेजला आले आणि मी फक्त मान खाली घालून उभा राहिलो..
actor bharat jadhav father slams kedar shinde after watching shreemant damodar pant natak
actor bharat jadhav father slams kedar shinde after watching shreemant damodar pant nataksakal

मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नट आणि एक दिग्गज दिग्दर्शक अशी दमदार जोडी म्हंटलं की एकच नाव आठवतं.. ते म्हणजे केदार शिंदे आणि भरत जाधव.. गेली कित्येकवर्षे ती ही जोडी रसिकांचे मनोरंजन करत आहे.

अनेक नाटकं, मालिका, चित्रपट या जोडीने गाजवले. मग 'सही रे सही'. 'दामोदर पंत' सारखं नाटक असो, 'हसा चकट फू' सारखी मालिका असेल किंवा 'जत्रा' सारखा चित्रपट.. अशा कित्येक कलाकृती या जोडगोळीने अजरामर केल्या आहेत.

केदारची कलाकृती म्हणजे भारत असणारच. केदार आणि भरतचं एक तूफान गाजलेलं नाटक म्हणजे 'श्रीमंत दमोदर पंत'.. ह्या नाटकात भरत जाधव प्रमुख भूमिकेत होता. हे नाटक अजरामर झालं, प्रेक्षकांना भरभरून हसवून गेलं. पण जेव्हा हे नाटक पाहायला भरतचे आई-वडील आले तेव्हा एकण वेगळाच किस्सा घडला त्याचीच एक गोष्ट एका मुलाखतीत केदारनं सांगितली आहे..

(actor bharat jadhav father slams kedar shinde after watching shreemant damodar pant natak_

actor bharat jadhav father slams kedar shinde after watching shreemant damodar pant natak
राजकारणात प्रामाणिकपणा फक्त कुत्र्यांनाच शोभतो.. सचिन पिळगावकरांचं हे विधान नेमकं कुणासाठी?

'दामोदर पंत' नाटकानंतर भरतच्या वडिलांनी मेकअप रूममध्ये येऊन केदार यांना सुनावलं होतं. केदार यांनी एका मुलाखतीत हा खास किस्सा सांगितला. श्रीमंत दामोदर पंत.. हे नाटक २००४ साली मराठी रंगभूमीवर आलं. या नाटकातील दामू, शांता, गणपत, सुमन, लखोबा ही सगळी पात्र अजरामर ठरली.

'या नाटकात भरतने दामोदर पंत आणि दामू अशी दोन पात्र साकारली होती. तर अभिनेते विजय चव्हाण दामूचे वडील म्हणजेच गणपत पंतांच्या भूमिकेत होते आणि अभिनेत्री रागिणी सामंत या दामूची आई म्हणजेच शांताच्या भूमिकेत होत्या.

या नाटकात अनेक ठिकाणी पंत दामूच्या अंगात आल्यानंतर 'पंत ऐ गणपत', 'ऐ शांता' अशा मोठ्याने हाका मारतो. त्यांना वाईटही बोलतो. 'गणपत कानफाड फोडेन..' हा डायलॉग तर खूप गाजला. तर भरत दामोदर पंत झाल्यानंतर आपल्या बापाचा म्हणजे गणपत पंतांनचा चिक्कार अपमान करतो. यावरूनच घडलेला किस्सा केदार यांनी सांगितला आहे.

केदार म्हणाले, 'नाटक राहिलं एका बाजूला पण खऱ्या आयुष्यातही गणपत आणि शांता ही नावं भरतच्या आई- वडिलांची नावं आहेत. त्यामुळे जेव्हा भरतचे आई वडील नाटक पाहायला आले तेव्हा माझ्या पोटात गोळा आला होता. मी घाबरलो होतो. नाटकानंतर भरतचे आई-वडील बॅकस्टेजला आले. तेव्हा मी अक्षरशः मान खाली घालून उभा होतो. ते आले आणि मला म्हणाले, चांगलाच उद्धार केलाय आमचा.. त्यावेळी मी ते ऐकून मीच माझा लाजलो .' असा किस्सा या यावेळी केदार यांनी संगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com