Pratap Pothen : प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रताप पोथेन यांचे चेन्नईत निधन

प्रताप पोथेन यांनी वेगवेगळ्या भाषेतील १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
Pratap Pothen
Pratap Pothenesakal

चेन्नई : मनोरंजन विश्वासाठी आज शुक्रवारी (ता.१५) दुःखद बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रताप पोथेन (Pratap Pothen) यांचे चेन्नई (Chennai) येथे निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या ६९ वर्षीच जगाचा निरोप घेतला आहे. वृत्तानुसार अभिनेता फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले होते. प्रताप पोथेन हे अचानक गेल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. (Actor Director Pratap Pothen Passes Away In Chennai)

Pratap Pothen
देव-देवतांची फोटो शेअर करत प्रकाश राज म्हणाले,आपण कुठे चाललो आहोत?

मात्र अद्यापही अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र ते गेल्या काही काळापासून ते आजारी होते. आजारपणामुळेच त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रताप पोथेन यांनी मार्थंडन आणि शिवलापेरी पांडीसह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी तामिळ, तेलगू, मळ्यालम आणि हिंदीत १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये (Entertainment) अभिनयही केला आहे.

Pratap Pothen
11 years of ZNMD: हृतिकमुळे फरहान आणि अभयचा जीव धोक्यात आला होता, कसे बचावले

त्यांनी पन्नीर पुष्पमंगल, आलियाथा गोलामंगल, मुदू बानी या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com