एजाज खान बिग बॉसमधून 'आऊट'; देवोलिनाची इंट्री

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 18 January 2021

कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात देवोलीनाची एण्ट्री झाल्याचे दिसत आहे.  

मुंबई -  बिग बॉस भारतीय टेलिव्हिजन वाहिनीवरील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्यात घडणा-या दैनंदिन घडामोडींविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. आता हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अशावेळी बिग बॉसच्या घरातून जाणा-या स्पर्धकांना परतावे लागत आहे. अशाच आणखी एका स्पर्धकाची एक्झिट झाली आहे. तो 106 दिवस बिग बॉसच्या घरात राहत होता.

बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता सलमान खान हा या कार्यक्रमाचे निवेदन करत आहे. प्रेक्षकांचा कार्यक्रमाला मिळणारा मोठा पाठींबा दरवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या व्टिस्टमुळे चर्चेत आलेला हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या बाबत आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातून एजाज खानला बाहेर पडावे लागले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं दिलेल्या वर्क कमिटमेंटमुळे त्याला घराबाहेर जावे लागले आहे. त्यानं कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नव्हते. ना की कुठले बेशिस्त वर्तन केले होते. आपल्या रागीट स्वभावानं त्यानं अनेकांची नाराजी ओढावून घेतली होती. तसेच प्रेक्षकांच्या टीकेलाही त्याला सामोरे जावे लागले होते. त्याच्या जाण्यानं बिग बॉसच्या घरातल्या काही सहका-यांना वाईट वाटले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात देवोलीनाची एण्ट्री झाल्याचे दिसत आहे.  अभिनेत्री पवित्रा पूनियाच्या प्रेमात पडलेला एजाज तिच्यावर शेअर केलेल्या पोस्टमुळेही भलताच प्रसिध्द झाला होता. त्याचे हे प्रेमप्रकरण सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले होते. एजाज खानने त्याच्या वर्क कमिटमेंटमुळे बिग बॉस 14 च्या घरातून एग्झिट घेतली आहे. तो 106 दिवस बिग बॉसच्या घरात होता. एजाज खान बिग बॉसच्या घरात त्याच्या स्वभावामुळे प्रसिध्द होता. एकिकडे त्याची सतत घरातली स्पर्धकांशी भांडणे होत होती.

बंडल 'तांडव', कथेवर नव्हे अभिनयावर तरलेला सत्तेचा 'नाटकी' पट

एजाज अभिनेत्री पवित्रा पूनियाच्या प्रेमात होता. प्रोमोमध्ये बिग बॉस एजाजच्या घरातील प्रवासाविषयी सांगत असून आणि नंतर त्याला घरातून बाहेर येण्यास सांगतात. ते ऐकून घरातील इतर स्पर्धकांना धक्काच बसतो.  दुसरीकडे अर्शी खानला रडू आवरत नसल्याचे यावेळी दिसून आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor Ejaz khan sudden out from big boss 14 video viral