esakal | फिरोज खान यांचे चिरंजीव अकरा वर्षांनी करणार 'विस्फोट'
sakal

बोलून बातमी शोधा

फिरोज खान यांचे चिरंजीव अकरा वर्षांनी करणार 'विस्फोट'

फिरोज खान यांचे चिरंजीव अकरा वर्षांनी करणार 'विस्फोट'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या प्रभावी अभिनयानं बॉलीवू़डचे दिवंगत अभिनेते फिरोज खान यांनी वेगळी ओळख प्रस्थापित केली होती. त्यांनी बॉलीवूडमध्ये मोठं नाव निर्माण केलं. मात्र त्यांची ती ओळख पुढे सुरु ठेवण्यास त्यांच्या चिरंजीव फरदीन खानला अपयश आलं. तो अभिनयापेक्षा इतर प्रकरणांमध्ये अडकून पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याची बॉलीवूडमधील प्रगती खुंटली. त्याला कारणीभूत तो स्वताच होता. अंमली पदार्थांच्या आहारी जाणं आणि वादात अडकून पडणं हे त्याच्या अपयशाचे कारण होते. असं त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या काळात मोजक्याच काही चित्रपटांमध्ये फरदीन झळकला होता. त्याचा अभिनयही जेमतेम असाच होता. आता तो तब्बल अकरा वर्षांनी प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि फरदीन खान हे एकत्र विस्फोट या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

हे बेबी नंतर रितेश आणि फरदीन हे एकत्र काम करणार आहे. विस्फोट हा चित्रपट फरदीनसाठी खूपच महत्वाचा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता हे करणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना गुप्ता यांनी सांगितलं की, मला फार आनंद झाला आहे की, रितेश या चित्रपटासाठी एक टीम तयार करत आहे. त्यासाठी त्यानं मेहनत घेतली आहे. गेल्या काही काळापासून आम्ही या प्रोजेक्टवर काम करत आहोत. मात्र आता तुम्हा सगळ्यांना सांगायला आनंद होतो आहे की, आमचा हा प्रोजेक्ट लवकरच सुरु होणार आहे. या महिन्याच्या शेवटी त्या प्रॉडक्शनचे काम सुरु होईल असेही गुप्ता यांनी सांगितलं आहे.

या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचे चिरंजीव फरदीन खान दिसणार आहे. तो शेवटी 2010 मध्ये दुल्हा मिल गया नावाच्या चित्रपटामध्ये दिसला होता. 2012 मध्य़े व्हेनेझुएलामध्ये झालेल्या महोत्सवामध्ये विस्फोटचं नामांकनही झालं होतं. फरदीन आणि रितेश हे चौदा वर्षांपूर्वी हे बेबीमध्ये दिसले होते. त्यानंतर ते आता एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा: 'माझ्या बायकोचे नाव जेनेलिया नाही, तर..'; रितेश देशमुखने सांगितलं खरं नाव

हेही वाचा: सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल

loading image
go to top