अभिनेता गुरमीत चौधरीने कोरोनामुक्त झाल्यानंतर कोरोनाबाधितांसाठी केलं 'हे' काम

gurmeet
gurmeet

मुंबई- अभिनेता गुरमीत चौधरीने काही दिवसांपूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर योग्य ते औषधोपचार घेऊन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने नुकतीच कोरोनावर मात केली. मात्र कोरोनाकाळात त्याला अनेक गोष्टींची जाणीव झाली आणि म्हणूनच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठी त्याने एक महत्वाचं काम केलं आहे.  

अभिनेता गुरमीत चौधरी आणि त्याची पत्नी देबिना बॅनर्जीने कोविड-१९चा संसर्ग झाल्याची माहिती ३० सप्टेंबरला दिली होती. हे दोघंही त्यांच्या मुंबईतील घरी होम क्वांरटाईन आहेत. आता अभिनेता गुरमीतने एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्याने नायर हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा दान केल्याची माहिती दिली आहे. त्याने यासाठी डॉक्टरांना धन्यवाद दिले आहेत. गुरमीतने हॉस्पिटलच्या कर्मचा-यांसोबत फोटो शेअर केला आणि म्हटलं की, मी पहिल्यांदा रक्तदान केलं आणि शुक्रवारी कोविड-१९ रुग्णांसाठी प्लास्मा दान करत आहे. हे नायर हॉस्पिटलचे डॉ. रमेश आहेत. उपचार आणि प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद.  

गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे सेलिब्रिटी कपल चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरच्या बेस्ट कपलपैकी हे एक आहेत. दोघांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचे चाहते काळजीत होते. चाहत्यांच्या प्रार्थना कामी आल्या आणि दोघेही कोरोनामुक्त झाले. लवकरच या दोघांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.   

actor gurmeet choudhary donated plasma for covid 19 patients  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com