'बिग बॉस'च्या घरात एका खास कारणासाठी होणार माजी स्पर्धक मोनालिसाची एंट्री

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 14 November 2020

शोच्या सुरुवातीलाच 'बिग बॉस'चे काही माजी स्पर्धक सिनियर म्हणून दिसून आले होते. मात्र आता पुन्हा एकदा 'बिग बॉस'च्या घरात एका माजी स्पर्धकाची एंट्री होणार आहे आणि त्याचं कारणंही तसं खास आहे.

मुंबई-  'बिग बॉस'च्या या १४ व्या सिझनमध्ये सुरुवातीपासूनंच पाहुण्यांची ये जा सुरु आहे. शोच्या सुरुवातीलाच 'बिग बॉस'चे काही माजी स्पर्धक सिनियर म्हणून दिसून आले होते. यामध्ये हिना खान, गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांचा समावेश होता. या सिनियर्सनी स्पेशल पॉवरसोबत काही दिवसांपुरतीच या घरात एंट्री घेतली होती. नंतर त्यांनी या शोमधून एक्झिट घेतली. मात्र आता पुन्हा एकदा 'बिग बॉस'च्या घरात एका माजी स्पर्धकाची एंट्री होणार आहे आणि त्याचं कारणंही तसं खास आहे. 

हे ही वाचा: 'द कपिल शर्मा शो'मध्ये गोविंदाच्या एंट्रीनंतर कृष्णा अभिषेकची एक्झिट  

'बिग बॉस'च्या १० व्या सिझनची स्पर्धक आणि भोजपूरी सुपरस्टार मोनालिसा बिग बॉसच्या घरात एंट्री करणार आहे. मोनालिसा तशाच एका खास कारणासाठी येतेय. हे खास कारण म्हणजे लवकरंच या वाहिनीवर तिचा शो सुरु होणार आहे. या शोचं नाव आहे 'नमक इश्क का'. या मालिकेत मोनालिसाची आव्हानात्मक आणि मुख्य भूमिका आहे.

'बिग बॉस १०' च्या माध्यमातून देशभरात प्रसिद्धी मिळवलेल्या मोनालिसाने 'नमक इश्क का' या मालिकेच्या आधी 'नजर' या मालिकेतील मोहनाच्या भूमिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळवली आहे. या शोमध्ये ती डायनच्या भूमिकेत होती जी प्रेक्षकांना खूप आवडली. 'बिग बॉस १०' च्या दरम्यान मोनालिसा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

इतकंच नाही तर तिने 'बिग बॉस'च्या घरात तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह राजपूतसोबत लग्न केलं होतं आणि आजही ते दोघं एकत्र आहेत. 'नमक इश्क' का या शोमध्ये ती नव्या रुपात दिसेल. याच शोच्या प्रमोशनसाठी ती बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार आहे.   

bigg boss 10 contestant monalisa to enter in bigg boss 14 house for this special reason  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 10 contestant monalisa to enter in bigg boss 14 house for this special reason