
TITLE TRACK OUT NOW: भूल भूलैया २ च्या पहिल्या गाण्याने केला काही तासातच कहर
'भूल भूलैया २' च्या ट्रेलर नंतर आता प्रेक्षकांना वाट होती ती गाण्याची.'भूल भूलैया' या प्रसिद्ध हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या यशानंतर आता 'भूल भूलैया २' च्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.दमदार रिलीज नंतर आता या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित होतंय.कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय.त्याच्या व्हिडिओला सोशल मीडियावर तासाभरात भरपूर प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
'रूह बाबासह तुम्हीही झिग जॅग स्टेप करा', असे कार्तिक आर्यनने त्याच्या या इन्स्टाग्राम पोस्टला कॅप्शन दिले आहे.तसेच 'भूल भूलैया २' या चित्रपटाच्या रिलीज डेटची माहितीही त्याने इन्स्टाग्रामला दिली आहे.या माहितीसह त्याने गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.(Kartik Aryan)त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.कोणी त्याच्या 'डान्स मूव्जचे कौतुक केले आहे तर कोणी या चित्रपटाच्या गाण्यांच्याच प्रतिक्षेत होतो',असे लिहत उत्साह व्यक्त केला आहे.
चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या गाण्याप्रमाणेच या गाण्याचा लय आहे.(Bhool Bhulaiyaa 2)पहिल्या भागाच्या ओरिजनल ट्रॅकला प्रितमने कंपोज केले होते तर दुसऱ्या भागाच्या गाण्याला तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे.तसेच कार्तिक आर्यनच्या ज्या मूव्जचे सोशल मीडियावर कौतुक होताना दिसतेय त्याला बॉस्को आणि सीजर याच्या कोरिओग्राठफीमधे सेट करण्यात आले आहे.२० मे ला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात कार्तिक आर्यनसह कियारा अडवाणी आणि तब्बू देखिल दिसणार आहेत.

अनीस बज्मीच्या निर्देशनात बनलेली भूल भूलैया २ २००७ मधे आलेल्या अक्षय कुमारच्या स्टारर चि्त्रपटाचा सिक्वल आहे.२००७ मधे आलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाने सगळ्यांना खळखळून हसवले होते.त्यामुळे या चित्रपटाबाबतच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Web Title: Actor Kartik Aryan Shared A Title Track On His Social Media Bhul Bhulaiyaa 2 Movie Kiara Adwani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..