Bhool Bhulaiyaa 2 Trailer | मंजुलिका परत आलीय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood News, Bhool Bhulaiyaa 2 Movie News Updates

Bhool Bhulaiyaa 2 Trailer: मंजुलिका परत आलीय!

Bollywood Movie: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) भुलभुलैय्याच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. त्यात त्याच्या भूमिकेबरोबरच विद्या बालननं (Vidya Balan) केलेल्या अभिनयानं तो चित्रपट वेगळ्याच उंचीवर गेला होता. दिग्दर्शक प्रियादर्शन यांना प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून भुलभुलैय्याचा दुसरा भाग (Bollywood News) नेटकऱ्यांच्या भेटीला येणार अशी चर्चा होती. आज त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या भागात कार्तिक आर्यननं (Karthik Aryan) प्रमुख भूमिका साकारली असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. हॉरर कॉमेडी (Horror Commedy) या प्रकारातील चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. त्यामुळे कार्तिक आर्यनच्या भुलभुलैय्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याच्याशिवाय कियारा अडवाणी आणि तब्बु यांच्या भूमिका चित्रपटात आहेत. (Bhool Bhulaiyaa 2 Movie News Updates)

कार्तिकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन भुलभुलैय्या 2 वरुन ट्रेलर व्हायरल केला आहे. नेटकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा प्रदर्शित होणार अशी विचारणा अभिनेत्याकडे केली होती. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली असून ते ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा चित्रपट येत्या 20 मे ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या प्रतिक्षा यादीत होता. कोरोनाचा मोठा फटका त्याच्या प्रदर्शनाला बसला. त्यामुळे निर्मात्यांनी तो आता प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी भुलभुलैय्याचा पोस्टरही व्हायरल झाला होता. त्याचे नेटकऱ्यांनी कौतूक केले होते.

हेही वाचा: Photo viral - तारक मेहतामधील बाबुलालच्या मुलीचं लग्न, चर्चा तर होणारच!

कार्तीकनं व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये त्यानं रिलिज डेट आणि ट्रेलर व्हायरल केला आहे. हॉरर कॉ़मेड़ीमध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बु मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय परेश रावल, राजपाल यादवही दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. त्याची निर्मिती भुषण कुमार यांनी केले आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या भुलभुलैय्यच्या पहिल्या भागाचा हा सिक्वेल असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दिग्दर्शकांनी हा चित्रपच पहिल्या भागाहून वेगळा असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: Viral Video: दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी अंगावर फेकतात आगीचे गोळे; 'थूथेधरा'ची अनोखी परंपरा

Web Title: Bhool Bhulaiyaa 2 Trailer Viral Rooh Baba Karthik Aryan Meet Fans Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..