kiran mane and nagraj manjule
kiran mane and nagraj manjulesakal

किरण माने आता नागराज मंजुळे सोबत.. काय आहे प्रकरण ?

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेला अभिनेता किरण माने याने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीमागे नेमकं काय कारण असेल.
Published on

मालिका जगतातील किरण माने प्रकरण सर्वांनाच ठाऊक आहे. स्टार प्रवाहवरील (star pravah) ‘मुलगी झाली हो’ (mulgi zali ho) ही मालिका घराघरात पोहोचली होती. अचानक मालिकेतील प्रमुख कलाकार किरण माने यांना कोणत्याही कारणाशिवाय काढून टाकण्यात आले. हा प्रकार राजकीय असल्याचा आरोप किरण माने यांनी केलाय त्यानंर मोठा राजकीय गदारोळ माजला होता. शेवटी हे प्रकरण गैरवर्तनातून घडल्याचे वाहिनीने स्पष्ट केले. तर सेटवरीतल महिलांशी त्यांचे वाद होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. याला देखील किरण माने यांनी विरोध दर्शवला होता. तब्बल पंधरा दिवस हे प्रकरण सुरु होते.

kiran mane and nagraj manjule
lock upp : लहानपणी एका मुलाने मला.. लैंगिक अत्याचाराबाबत कंगनाचा खुलासा

किरण माने कायमच केंद्र सरकारला धारेवर धरणारी विधाने करत असतात. तसेच कला क्षेत्रातील बड्या मंडळींसोबत फोटो शेअर करून ते आपल्या आठवणी सांगत असतात. आज अशीच एक आठवण त्यांनी सांगितली आहे. हा फोटो चक्क दिग्दर्शक नागराज मंजुळे (nagraj manjule) यांच्यासोबत काढलेला आहे. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी नागराज मंजुळे यांची भेट घेतली होती. हा कोलाज फोटो असून पहिल्या फोटोत ते दोघे हातात हात घालून कोणत्या तरी विषयावर गप्पा करत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोत नागराज मंजुळे हे किरण मानेंशी चर्चा करत आहेत. त्यानंतर तिसऱ्या फोटोत दोघांचा सेल्फी आहे.

kiran mane and nagraj manjule
ख्रिस राॅकच्या आईची संतप्त प्रतिक्रिया.. म्हणाली, 'विल स्मिथला व्हायला हवी ही शिक्षा..'

या फोटोला ‘जाळ न् धूर संगट !’ असे कॅप्शन किरण माने यांनी दिले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे दिसत आहे. या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. मध्यंतरी किरण माने यांनी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी नागराज मंजुळे आणि ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक केले होते. विशेष म्हणजे यासोबत त्यांनी नागराज मंजुळे यांची एक कविताही शेअर केली होती. किरण माने यांनी नागराज सोबत फोटो शेअर केल्यांनतर या भेटी मागे नेमका उद्देश काय, यावर चर्चा सुरु आहे. नागराज यांच्या आगामी सिनेमात किरण दिसणार का, हे नेमकं काय कनेक्शन आहे असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com