'नळामुळे माझा दमयंती झाला'; ललित प्रभाकरचा व्हिडीओ चर्चेत

'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' या प्रसिद्ध मराठी गाण्यावर ललितने हा व्हिडीओ केला आहे.
'नळामुळे माझा दमयंती झाला'; ललित प्रभाकरचा व्हिडीओ चर्चेत

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा कलाकार ललित प्रभाकर (lalit prabhakar) सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच ललितने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला. 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' या गाण्यावर ललितने हा व्हिडीओ केला आहे. ललितच्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर केला आहे.

ललितने शेअर केलेल्या व्हि़डीओमध्ये दिसत आहे की, तो बेसिनमध्ये हाथ धुण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो ज्या नळाखाली हाथ धरत आहे त्यामधून पाणी येत नाही. ललितने एका नळा खाली हात धरला असेल तर पलीकडच्या नळातून पाणी यायला सुरुवात होते. या व्हिडीओला ललितने कॅप्शन दिले , 'हाथ भी नही आया और मूॅंह भी नही लगा'. अभिनेता अमेय वाघने ललितच्या व्हिडीओला कमेंट केली, 'नळ स्टॉपच्या टॉयलेटमध्ये असंच असतं' यावर ललितने त्याला रिप्लाय दिला, 'अरे पण या नळामुळे माझा दमयंती झाला…' अमेयसोबतच अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, स्पृहा जोशी, मृण्मयी गोडबोले या कलाकरांनी देखील कमेंट करत ललितच्या व्हिडीओला पसंती दिली.

'नळामुळे माझा दमयंती झाला'; ललित प्रभाकरचा व्हिडीओ चर्चेत
शमिता शेट्टीने सांगितलं 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यामागचं खरं कारण

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे ललितला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील ललित आणि प्राजक्ता माळीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होता. त्यानंतर आनंदी गोपाळ, हंपी आणि स्माईल प्लिज या चित्रपटांमध्ये ललितने काम केले. लवकरच ललितचा 'मिडियम स्पायसी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये ललितसोबत पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

'नळामुळे माझा दमयंती झाला'; ललित प्रभाकरचा व्हिडीओ चर्चेत
सोनाली कुलकर्णीच्या 'तमाशा Live'च्या पोस्टरने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com