
मुंबई - आपल्याला नेहमी त्याच्या फिटनेसच्या व्हिडिओमधून लोकांना आरोग्याचे महत्व पटवून देणा-य़ा बॉलीवूडच्या प्रसिध्द अभिनेता आणि मॉडेलला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्यासारख्या कलाकाराला कोरोनाची लागण झाल्यानं बॉलीवूडमधील आणखी एका सेलिब्रेटीला क्वॉरंनटाईन व्हावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसुन आले आहे. यामुळे सेलिब्रेटींमध्ये भीतीचे वातावरण आहे. य़ापूर्वी दिग्दर्शक सतीश कौशिक, आमीर खान, मनोज वाजपेयी, धर्मेंद्रच्या घरातील तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
आर्यनमॅन म्हणून प्रसिध्द असणा-या मिलिंदला कोरोना झाला हे त्याच्या चाहत्यांच्या पचनी पडणारी गोष्ट नाही. एवढा फिट असणारा मिलिंद, त्याचा वर्क आऊट पाहिल्यास त्याला कोरोना होऊ शकतो यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. दिवसेंदिवस कोरोनाचे भय वाढत चालले आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर महाराष्ट्रात आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यानं पेशंट्सची संख्या वाढत असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरी कोरोनाची भीती नागरिकांच्या मनात अद्याप आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर जवळ बाळगणे यासारखें उपाय आरोग्य खात्याकडून सुचवण्यात आले आहे. मात्र त्याचा गांभीर्यानं विचार करत नसल्याचेही दिसून आले आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना कोरोनाची लागण व्हायला सुरुवात झाली आहे. आता प्रसिध्द मॉडेल म्हणून परिचित असलेला मिलिंद सोमण हा कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या दररोज वेगवेगळे कलाकार कोरोना पॉझिटि्व्ह येत असल्याची माहिती समोर येते आहे. आपण कोरोना संक्रमित असल्याची माहिती मिलिंदनं सोशल मीडियावर दिली आहे. गुरुवारी मिलिंदनं व्टिटरवर लिहिलं आहे की, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आणि मी क्वॉरनंटाईन झालो आहे.
मिलिंदच्या अगोदर आमीर खान, आर माधवन, रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, कार्तिक आर्यन, सिध्दांत चतुर्वेदी, तारा सुतारिया आणि सतीश कौशिक यांच्यासहित अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. आपल्या फिजिकल फिटनेससाठी प्रसिध्द असणारा मिलिंद सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव्ह असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.