Nawazuddin Siddique: मल्टीप्लेक्स मध्ये तिकिटांचे दर कमी करावेत, नवाझुद्दीन जरा स्पष्टच म्हणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Nawazuddin Siddique, Nawazuddin Siddique news

Nawazuddin Siddique: मल्टीप्लेक्स मध्ये तिकिटांचे दर कमी करावेत, नवाझुद्दीन जरा स्पष्टच म्हणाला

Nawazuddin Siddique News: नवाझुद्दीन सिद्दीकी सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. नवाझचे कौटुंबिक वाद, त्याच्या बायकोने कोर्टात आणि सोशल मीडियावर केलेली वक्तव्य अशा अनेक कारणांमुळे नवाझुद्दीन सध्या चर्चेत आहे.

सध्या नवाझुद्दीनने मल्टिप्लेक्स मधील वाढलेल्या तिकीट दरावर भाष्य केलंय. नवाझने ANI ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सविस्तर भाष्य केलंय.

(Actor Nawazuddin Siddiqui talk about low price rate of ticket rates in multiplex)

नवाझुद्दीन म्हणाला.. प्रत्येक राज्यात सिनेमांना आर्थिक सपोर्ट दिला जातो. कलाकारांना सपोर्ट केला जातो. मग मध्य प्रदेश असो, उत्तर प्रदेश असो. अजूनही दुसरी राज्य आहेत. तिथे सिनेमांना सबसिडी दिली जात. ती खूप चांगली गोष्ट आहे.

सध्या थेटर मध्ये प्रेक्षक कमी येत आहेत. याचं कारण म्हणजे.. त्यासाठी की multiplex मध्ये सिनेमाचे रेट थोडेसे जास्त आहेत. सिनेमांच्या तिकीट दराकडे थोडं लक्ष दिलं तर चांगलं होईल. यामुळे लोकं पुन्हा थिएटर कडे वळतील.

अनुराग कश्यपनं 'द केरळ स्टोरी' च्या बंदी विरोधात भाष्य केल्याचं दिसून आलं. त्याचं म्हणणं होतं की, असं कोणत्याही सिनेमावर बंदी आणायला नको.

आता बॉलीवूड अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकीनं अनुराग कश्यपच्या विधानाचं समर्थन केलं आहे. नुकतीच त्यानं एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत दिली,ज्यात तो म्हणाला आहे,''अनुराग कश्यपच्या वक्तव्याचं मी समर्थन करतो''.

नवाझुद्दिन सिद्दिकी विषयी बोलायचं झालं तर सध्या तो त्याच्या 'जोगिरा सारा रा रा..' मुळे चर्चेत आहे.

हा सिनेमा २६ मे रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत नेहा शर्मा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.