Nawazuddin Siddiquiचा पलटवार! गंभीर आरोप करत भाऊ आणि बायकोवर दाखल केला 100 कोटींच्या मानहानीचा खटला

Nawazuddin Siddiqui Bollywood Actor trolled
Nawazuddin Siddiqui Bollywood Actor trolledesakal

नवाजुद्दिन सिद्दीकी हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयूष्यामुळं चर्चेत आहे. त्याची पत्नी आलिया आणि भाऊ शमास नवाब सिद्दीकी आणि नवाजची पत्नी आलियाही नेहमीच त्याच्यावर अनेक गंभीर आरोप लावत आहे. काही दिवसांपुर्वी त्याच्या मोलकरणीनेही नवाजवर गंभीर आरोप केले आणि त्यांनतर नवाजची माफी मागत ते आरोप मागे घेतले. मात्र आलियाने त्याच्यावर आरोपाचे सत्र सुरुच ठेवले आहे.

तर त्याच्या भावाने नवाज त्याच्या स्टाफला मारहाण करतो आणि त्याने पैशांसाठी तो काहीही करु शकतो असे अनेक गंभीर आरोप नवाजवर करण्यात आले आहे.

नवाजने हे सर्व आरोप फेटाळले आहे. नुकतचं मुलांसाठी त्याने सामज्यंस करार करण्याची तयारीही दाखवली आहे. मात्र हा खटला सुरु असतांनाच

आता नवाजने मुंबई उच्च न्यायालयात त्यांचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी आणि माजी पत्नी आलिया यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

या दाखल केलेल्या याचिकेत नवाजने म्हटले आहे की, जेव्हा शमशुद्दीनकडे काम नव्हतं तेव्हा नवाजने त्याला २००८ मध्ये मॅनेजर म्हणून कामावर घेतले होतं. यासोबतच ते लेखापरीक्षण, आयकर भरणे आणि जीएसटी भरण्याचे कामही पहायचा.

नवाजला अभिनयावर पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे म्हणून त्याने त्याचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, स्वाक्षरी केलेले चेकबुक, बँकेचे पासवर्ड, ईमेल पत्ते यासारख्या गोष्टी त्याच्या भावाला कामासाठी दिल्या होत्या. मात्र शमासने त्यांची फसवणुक केली आहे.

नवाजला सांगतानाच त्यांनी संयुक्त नावावर मालमत्ता खरेदी केली होती. या मालमत्तांमध्ये एक फ्लॅट, यारी रोड येथील व्यावसायिक मालमत्ता, बुलढाणा येथील एक जागा, शाहपूर येथील फार्म हाऊस, दुबईतील मालमत्ता आणि रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू, डुकाटीसह १४ वाहनांचा समावेश आहे.

नवाजने भाऊ आणि माजी पत्नीआलिया यांच्यावर २० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोपही केला आहे. एवढेच नाही तर शमसुद्दीनने 2020 पासून नवाजसोबत काम करणे बंद केले होते, त्यानंतर नवाजला आयकर, जीएसटी आणि विविध सरकारी विभागांकडून 37 कोटी रुपयांच्या थकबाकीच्या नोटिसा मिळाल्या होत्या. याचा अर्थ शमासने त्याच्याकडून पैसे तर घेतले मात्र भरणा केला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com