सारा-सुशांतने ड्रग्ज घेतलं का? नितीश भारद्वाज म्हणाले..

रियाने घेतलं होतं साराचं नाव
actor nitish bharadwaj, sushant singh rajput and sara ali khan
actor nitish bharadwaj, sushant singh rajput and sara ali khanfile image

प्रसिद्ध मालिका 'महाभारत'मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज (nitish bharadwaj) यांनी नुकताच दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) आणि अभिनेत्री सारा अली खान(sara ali khan) यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. रिया चक्रवर्तीने एनसीबीला दिलेल्या जबाबात तिने म्हटले होते की, सारा अली खाननं काही अंमली पदार्थांची मागणी केली होती. रियानं सुशांत ड्रग्ज प्रकरणामध्ये सारा अली खानचे नाव घेतल्याचे समोर आले होते. तर सारानेही केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत मादक पदार्थंचे सेवन करत होता, असे सांगितले होते. आता या सर्व प्रकरणावर अभिनेते नितीश भारद्वाज यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.(actor nitish bharadwaj on sushant singh rajput sara ali drugs controversy)

सारा आणि सुशांतबद्दल नितीश यांचे मत

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीश यांनी सांगितले की, 'मी सुशांत आणि साराला नशेमध्ये कधीच पाहिले नव्हते. सुशांत सिगारेट ओढायचा, पण त्याची बुद्धी नेहमी तल्लख असायची. ड्रग्जचं सेवन करणाऱ्या माणसाची बुद्धी आणि डोकं इतक्या जलदगतीने काम करत नाही. तो नेहमी माझ्यासोबत विज्ञान आणि ग्रह, ताऱ्यांबद्दल बोलत होता.' नितीश आणि सुशांत-सारा यांनी 'केदारनाथ' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

actor nitish bharadwaj, sushant singh rajput and sara ali khan
खासदार नुसरत जहांच्या रिलेशनशिपची चर्चा; यश दासगुप्ता आहे तरी कोण?
actor nitish bharadwaj, sushant singh rajput and sara ali khan
खासदार नुसरत जहांच्या रिलेशनशिपची चर्चा; यश दासगुप्ता आहे तरी कोण?

नितीश यांनी हे देखील सांगितले की सुशांतने त्यांना एकदा घरी येण्यासाठी आमंत्रण देखील दिले होते. त्यावेळी ते यायला तयार देखील झाले होते. नितीश भारद्वाज यांनी केदारनाथ चित्रपटामध्ये साराच्या वडिलांची भूमिका साकारली होता.

actor nitish bharadwaj, sushant singh rajput and sara ali khan
रिया चक्रवर्ती साकारणार 'द्रौपदी'?; बिग बजेट चित्रपटाची ऑफर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com