esakal | मनोज तिवारी झाला बाबा, लहान परीचा फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Tiwari

प्रसिध्द भोजपुरी अभिनेता आणि दिल्ली बीजेपीचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांना कन्या रत्न झाले आहे. त्यानिमित्ताने एक पोस्ट सॊशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्यांना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करून मनोज यांनी ही माहिती दिली आहे.

मनोज तिवारी झाला बाबा, लहान परीचा फोटो व्हायरल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - प्रसिध्द भोजपुरी अभिनेता आणि दिल्ली बीजेपीचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांना कन्या रत्न झाले आहे. त्यानिमित्ताने एक पोस्ट सॊशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्यांना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करून मनोज यांनी ही माहिती दिली आहे. 

ट्विट करुन मनोज यांनी लिहिले आहे की, माझ्या घरी आता एक लहान परी आली आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आय एम ब्लेस्सेंड विथ अ बेबी गर्ल...जय जगदंबे असे त्यांनी लिहिले आहे. ज्यावेळी मनोज यांनी ही गोड बातमी देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या गेल्या. मनोज तिवारी यांची एक मुलगी सध्या मुंबई येथे शिक्षण घेत आहे. तिला भेटायला ते नेहमीच मुंबईला जात असतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोजपुरी ऐक्ट्रेस अक्षरा सिंह ने मनोज तिवारी यांना मुलगी झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. तिनं इंस्टाग्रामवर याविषयीची पोस्ट शेयर केली. 2013 मध्ये मनोज तिवारी हे बीजेपी मध्ये गेले. 2014 मध्ये त्यांनी दिल्ली मध्ये लोकसभा निवडणुक लढविली. त्यात त्यांनी कोंग्रेस चे पुर्व अध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल यांचा पराभव केला होता. आणि ते बीजेपीचे अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली पार्टीने निगम ची निवडणूक लढविली. तसेच 2019 मध्ये पुन्हा एकदा उत्तर पूर्व दिल्लीतुन निवडणूक लढविली. आणि त्यात ते विजयी झाले.

बिग बॉस १४: विकास गुप्ताच्या आईने सोडलं मौन, 'बाइसेक्शुएलिटीच्या आधीच तुटलं होतं नातं'

मनोज तिवारी एक प्रख्यात अभिनेता म्हणून प्रसिध्द आहेत. याशिवाय ते सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय ओळख निर्माण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. ते कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे सेलिब्रिटी आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टवरून वादंगही झाले आहेत.

Edited By - Prashant Patil

loading image