Puneeth Rajkumar
Puneeth Rajkumar

अभिनेता पुनीत राजकुमारला हृदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर

ICU मध्ये पुनीतवर उपचार सुरू

कन्नड अभिनेता पुनीत राजकुमारला आज (शुक्रवार) हृदयविकाराचा झटका आला असून बेंगळुरूमधील विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुनीतवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून डॉक्टरांची एक टीम त्याच्या देखरेखेसाठी कार्यरत आहे. ४६ वर्षीय पुनीतला सकाळी छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज ए. बोम्माई हे विक्रम रुग्णालयात पुनीतची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. पुनीत चाहत्यांमध्ये 'अप्पू' या नावाने ओळखला जातो.

छातीत दुखू लागल्याने पुनीतला सकाळी साडेअकराच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या उपचारासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पण त्याची प्रकृती गंभीर आहे. सध्या आम्ही काहीच सांगू शकत नाही. रुग्णालयात दाखल करताना त्याची प्रकृती गंभीर होती. आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती विक्रम हॉस्पिटलचे डॉक्टर रंगनाथ नायक यांनी दिली.

Puneeth Rajkumar
'दोन वर्षे माझी बँक खाती गोठवली अन्..'; वानखेडेंवर अनुराग कश्यपचा आरोप

पुनीत हा दिग्गज अभिनेते राजकुमार आणि पर्वतम्मा यांचा मुलगा आहे. त्याने २९ हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बालकलाकार म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९८५ मध्ये 'बेट्टाडा हूवू' या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर 'चालिसुवा मोडागालू' आणि 'येराडू नक्षत्रगालू' मधील अभिनयासाठी त्याला कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com