अभिनेता रवी दुबे याची "आंकडे" ही कविता प्रदर्शित...

संतोष भिंगार्डे
Saturday, 18 July 2020

रवी दुबे याने 'जमाई राजा', 'सास बिना ससुराल', 'सबसे स्मार्ट कौन ?' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 'खतरों के खिलाडी'च्या एका सिझनमध्ये तो स्पर्धक म्हणूनही आपल्याला दिसला होता.

मुंबई : अभिनेता रवी दुबे याने "आंकडे" नावाची कविता यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसमोर आणली. ही कविता त्याने स्वतः लिहिली आहे. या कवितेतून त्याने मनोरंजन क्षेत्रातील व्याप्ती, बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि टीआरपी या विषयांवर भाष्य केलं आहे. रवी याची ही कविता हिंदी भाषेत आहे.

'दिल बेचारा'साठी अभिनेत्री संजना सांघीने शिकली बंगाली भाषा...

कवितेच्या माध्यमातून रवीने लोकांना फेमऐवजी टेलेंटकडे लक्ष देण्याचा आग्रह केला आहे. त्याने लॉकडाऊन दरम्यान मोठ्या नावांचा दबाव कसा थांबला, लोकांना उत्कृष्ट कामांमध्ये गुंतवणूक करा आणि त्यांच्या कौशल्यांच्या प्रेमात पडा असे सांगितले आहे.

मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी एकता कपूरने स्थापन केले 'मेन्टल हेल्थ अवरनेस फंड'...

त्याच्या या कवितेने त्याचे चाहते प्रभावित झाले आहेत. या कवितेला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. "हे खूप हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायक आहे," असे एका चाहत्याने यूट्यूब वर कमेंटमध्ये लिहिले. रवी दुबे याने 'जमाई राजा', 'सास बिना ससुराल', 'सबसे स्मार्ट कौन ?' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 'खतरों के खिलाडी'च्या एका सिझनमध्ये तो स्पर्धक म्हणूनही आपल्याला दिसला होता.
---
(संपादन : ऋषिराज तायडे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor ravi dubeys poem aankade release on youtube