मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी एकता कपूरने स्थापन केले 'मेन्टल हेल्थ अवरनेस फंड'...

ekta kapoor
ekta kapoor

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर त्याच्या जवळच्या मित्र परिवाराने तसेच काही कलाकारांनी व त्याच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या नावाने एखादे तरी सामजिक काम केलं आहे. आता निर्माती एकता कपूरने मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करण्यासाठी मेंटल हेल्थ अवरनेस फंड सुरू केला आहे आणि त्याला नाव दिले आहे पवित्र रिश्ता. याद्वारे मानसिक आरोग्य उत्तम राखण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. याकरिता झी 5 चे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण कटियाल यांचेही सहकार्य लाभले आहे.

याबाबत सांगताना एकता कपूर म्हणाली, "दहा वर्षांपूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यात फारच बदल झाला आहे. आजचा काळ फारच बदलला आहे, कारण आज जास्त दबाव आहे. आजूबाजूच्या साथीच्या आजारांमुळे आपण सर्व आपल्या घरातच अडकलो आहोत. त्यामुळे लोकांना खूपच तणाव आणि चिंतेचा सामना करावा लागतो. कामाचा तणाव, घरात होणारे वादविवाद, नोकरी गमावणे इत्यादी कारणांमुळे बर्‍याच लोकांमध्ये मानसिक आरोग्याची परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यासाठी आम्ही 'पवित्र रिश्ता' फंडाची सुरुवात केली आहे. मला आनंद आहे की हे काम करून माझ्याकडून एक चांगलं समाजकार्य होत आहे."

'झी 5' चे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण कटियाल म्हणाले, "आमचा प्रयत्न हा आहे की समाजात मानसिक आजारांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जितके शक्य होईल तितक्या लोकांना मदत करणे." पवित्र रिश्ता हा एकता कपूरची सिरियल होती. ज्या सिरियल मधल्या मानव देशमुख भूमिकेने सुशांतला घराघरात पोहोचवले आणि लोकांचे प्रेम दिले. त्यामुळे या फंडाचे नाव पवित्र रिश्ता असे ठेवण्यात आले आहे.
------------------
(संपादन : ऋषिराज तायडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com