esakal | 'एक नारळ दिलाय दर्या देवाला..'; पहा रितेशचा भन्नाट डान्स

बोलून बातमी शोधा

Actor Riteish Deshmukh marathi song video viral.jpg

नुकताच या गाण्याचा व्हिडीओ रितेशने पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर जो ट्रेण्ड सुरु असतो तो रितेश नेहमी फाॅलो करतो.

'एक नारळ दिलाय दर्या देवाला..'; पहा रितेशचा भन्नाट डान्स
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सध्या एक नारळ दिलाय दर्या देवाला हे गाण सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. नेटकरी या गाण्यावर लिप्सिंग करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

आमच्यासाठी कोरोना आणि करीनासुद्धा; आमिर खान झाला ट्रोल

नुकताच या गाण्याचा व्हिडीओ रितेशने पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर जो ट्रेण्ड सुरु असतो तो रितेश नेहमी फाॅलो करतो. त्याने  एक नारळ दिलाय दर्या देवाला हे गाणे ऐकले आणि त्या गाण्यावर व्हिडीओ बनवून पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करून रितेशने त्याला कॅप्शन दिले, ' या गाण्याच्या मी प्रेमात पडलोय. नारळ पाणी बाय, धृवन मोर्थी आणि प्रित बेर्डे.' या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले असून अनेक जणांनी कमेंट केल्या आहेत.

धृवन मोर्थी आणि प्रित बेर्डे या संगितकारांनी तयार केले. हे गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रितेश नेहमी नवोदित कलाकारांचे कौतुक करत असतो. या संगितकारांचे देखील त्याने कौतुक करत हा व्हिडीओ शेअर केला. संगितकार प्रित बेर्डेने रितेशचा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे.  

स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधीच्या पत्निचे आयुष्य खडतर ; सांगितला अनुभव 

'तुझे मेरी कसम' या हिंदी चित्रपटाच्या सेटवर जेनिलीया आणि रितेशची ओळख झाली. जेनिलीया आणि रितेश अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2012 ला लग्न केले. जेनिलीया आणि रितेशला राहिल आणि रियान नावाचे दोन मुलं आहेत. धमाल , हाऊस फूल, बाघी 3, एक व्हिलन या हिट चित्रपटांमधून रितेश प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तसेच माऊली आणि लय भारी या मराठी चित्रपटामधून रितेशने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.