राष्ट्रपती राजवटीवर काय म्हणाला रितेश...

Ritesh deshmukh on Presidential rule in Maharashtra
Ritesh deshmukh on Presidential rule in Maharashtra

मुंबई : महाराष्ट्रातील सध्याची सर्वात महत्तवाची आणि मोठी बातमी म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आता राज्यपालांकडून आलेल्या शिफारसीवर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे अखेर मंगळवारी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यावर अनेकांनी मतप्रदशने केली असतानाच अभिनेता रितेश देशमुख यानेही आपलं मत व्यक्त केलं आहे. जाणून घ्या राज्यातील राष्ट्रपती राजवटीवर नक्की काय म्हणणं आहे रितेशचं ! 

राष्ट्रपती राजवटीवर रितेश म्हणाला,' सध्या राज्यातील स्थिती काय आहे याची मला जाणीव आहे. भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष विरोधी बाकांवरच बसणार होते. शिवसेनेचा अडीच वर्षांचा मुख्यमंत्री आणि सत्तेतील समान वाटा या भूमिकेसह महायुतीला बहुमत मिळाले असतानाही शिवसेनेने भाजपासोबत जाण्याचे टाळले. राज्याचे मुद्दे लक्षात घेता एका स्थिर सरकारची गरज आहे. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी राजकीय आहे. पण तरीही या देशाचा नागरिक म्हणून मलाही राज्यामध्ये पाच वर्षांचे एक स्थिर सरकार हवे आहे.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Latur

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

विधानसभा निवडणूकीत धिरज आणि त्याचा सख्खा मोठा भाऊ अमित या दोघांनाही भरघोस मते मिळाली. विलासरावांची पुण्याई आणि या भावंडांचे काम बघून लोकांनी पुन्हा एकदा निवडून दिले आहे. त्यांच्या प्रचारात त्यांचा भाऊ आणि अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया देशमुखही सहभागी होते. अमित आणि धीरज देशमुख यांनी कॉंग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे धीरज यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि 1.21 लाख मतांनी त्यांचा विजय झाला. लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज यांनी  निवडणूक लढवली होती तर, दुसरीकडे अमित य़ांनी लातूर शहर मतदारसंघातून विजय प्राप्त केला. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. निवडणुकीपूर्वी युती म्हणून लढलेल्या भाजप-शिवसेनेत निकालानंतर बेवनाव झाल्यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ शकली नाही. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू आहे. राष्ट्रपती राजवटीची वेळ महाराष्ट्रावर तिसऱयांदा आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com