esakal | 'बिग बी' म्हणाले म्हणून बदलला 'राष्ट्रपती भवनातील' नियम
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

'बिग बी' म्हणाले म्हणून बदलला 'राष्ट्रपती भवनातील' नियम

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील शहेनशहा म्हणून अमिताभ (bollywood actor amitabh bachchan) म्हणून प्रसिध्द आहेत. आता बॉलीवूडमध्ये त्यांच्या नावानं अनेक दंतकथा लोकप्रिय झाल्या आहेत. आपण जिथे उभे राहतो तिथूनच लोकांची रांग सुरु होते. अशा आशयाचा त्यांच्या तोंडी एक संवाद होता. त्याची प्रचिती नेहमीच येते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या अमिताभ यांचा राष्ट्रपती भवनातील (president house) एक किस्साही फेमस आहे. सध्या तो प्रसंग सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. 70 च्या दशकापासून लोकप्रिय झालेल्या अमिताभ यांची क्रेझ अद्यापही कायम आहे. (bollywood actor amitabh bachchan the rashtrapati bhavan rule was changed yst88)

सध्या अमिताभ यांचे काही महत्वाचे प्रोजेक्ट सुरु आहेत. दिवाळी अखेर त्यांचे दोन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या उंबरठ्यावर आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड (nagraj manjule jhund) नावाचा चित्रपट अजून प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनामुळे त्याची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अमिताभ सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग शेयर करत असतात. त्यांचा राष्ट्रपती भवनातील प्रसंग चर्चेत आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रपती भवनात जे नियम आहेत त्यातील एक नियम बदलण्यात आला. त्यामागील कारण होते, अमिताभ बच्चन. 1983 साली अमिताभ टिनु आनंद यांच्याबरोबर मै आझाद हु नावाची फिल्म करत होते. त्यात त्यांच्या जोडीला शबाना आझमी होत्या. हा तोच चित्रपट होता जो पुन्हा अमिताभ यांनी रिलाँच करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा अमिताभ हे राजकारणात सक्रिय झाले होते. राजकोटमध्ये चित्रिकरण सुरु असताना शबाना आझमी यांनी अमिताभ यांना एक प्रश्न विचारला होता. आपण खासदार असताना काय महत्वाचा बदल केला, कोणता नवीन कायदा अंमलात आला आहे का,

हेही वाचा: Cannes Film Festival 2021; 'टायटन' ठरला 'सर्वोत्कृष्ठ' चित्रपट

हेही वाचा: 'आर्थिक संकटात होतो तेव्हा...' ; राजपाल यादवने सांगितल्या आठवणी

शबाना आझमी यांच्या त्या प्रश्नाचे उत्तर देताना अमिताभ म्हणाले, जेव्हा मी राष्ट्रपती भवनात एका मेजवानीला गेलो होतो तेव्हा ज्या प्लेटमध्ये जेवण होते त्या प्लेटवर अशोक स्तंभाचे चित्र होते. मला खूप राग आला होता. संसदेत ही गोष्ट मी सर्वांच्या निदर्शनास आणून दिली. आपल्या राष्ट्रीय प्रतिकाचा अपमान करतो आहोत. हे सर्वांना सांगितले. त्यानंतर एक नवीन कायदा झाला. त्यात राष्ट्रपती भवनातील प्लेट्सवरुन राष्ट्रीय प्रतिक हटविण्यात यावे. असे सुचित करण्यात आले होते.

loading image