esakal | 'सैफ काय 60 वर्षांचा आहे का?'; नेटकरी खवळले

बोलून बातमी शोधा

actor saif ali khan gets trolled after taking corona vaccine people asks is he 60 years }

साधारण दोन महिन्यांपूर्वी सैफची प्रमुख भूमिका असलेली तांडव मालिका प्रदर्शित झाली होती.

manoranjan
'सैफ काय 60 वर्षांचा आहे का?'; नेटकरी खवळले
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचा नवाब असणा-या सैफ अली खानला पुन्हा एका वेगळ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं कोविडची लस घेतल्यानंतर केलेली टिप्पणी. यामुळे सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोल झाला आहे. सैफ एका कोविड सेंटरच्या बाहेर लस घेण्यासाठी गेल्याचे दिसून आले. त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र त्यानंतर ट्रोल व्हायला सुरुवात झाली आहे. त्याला नेटक-यांनी प्रश्नही विचारले आहेत. सैफ तर 60 वर्षांचा नाही तर त्याला कशी काय लस मिळाली असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. यामुळे सोशल मीडियावर सैफवर सडकून टीका होताना दिसत आहे.

साधारण दोन महिन्यांपूर्वी सैफची प्रमुख भूमिका असलेली तांडव मालिका प्रदर्शित झाली होती. ती वादाच्या भोव-यात सापडली. तो वाद इतका टोकाला गेला की त्यामुळे तक्रारदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयानं निर्माते, दिग्दर्शक यांना धारेवर धरले होते. अभिव्यक्तीच्या नावाखाली काहीही खपवून घेतले जाणार नाही. या शब्दांत त्यांना फटकारले होते. आता सैफ पुन्हा त्याच्या कोविडच्या लशीकरणामुळे चर्चेत आला आहे. त्याला लस मिळाली कशी असा प्रश्न सोशल मीडियावरुन सैफला विचारण्यात आला आहे.

आमीरचे 'हरफन मौला' व्हायरल, 'कोई जाने ना' 26 मार्चला होणार प्रदर्शित

काही नेटक-यांनी त्याला म्हातारा असे संबोधले आहे. तर काहींनी त्याला अशाप्रकारची व्हीआयपी ट्रीटमेंट कशासाठी असा प्रश्न विचारला आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार वय वर्षे 60 पेक्षा जास्त असणा-यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. त्यामुळे सैफला ती लस कशी मिळाली असा प्रश्न त्याला विचारण्यात आला आहे.

 सुशांतला ड्रग्जची विक्री करत होता, गोव्यातून केली अटक

दुसरीकडे अनेकांनी सैफची बाजू घेतली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, भारत सरकारच्या गाईडलाईन नुसार 60 वर्षाच्या पुढे आणि ज्यांचे वय 45च्या पुढे आहे आणि ते गंभीर जखमी असल्यास त्यांना लशीकरण करण्याचा अधिकार आहे. अशी भूमिका सैफच्या चाहत्यांनी घेतली आहे.