चित्रपटसृष्टीत संकेतची विशी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

पुण्याचा संकेत मोरे याने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरवात केली.  विशेष म्हणजे संकेतने यंदा चित्रपटसृष्टीमध्ये 20 वर्षे पूर्ण केली आहेत.

पुण्याचा संकेत मोरे याने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरवात केली. "साईबाबा', "वसुधा', "कथासरिता', "पदरी आलं आभाळं', "रंग माझा वेगळा' अशा मराठी व हिंदी मालिका, डॉक्‍युमेंटरी व नाटकांमध्ये त्याने काम केलं. जसजसा तो मोठा होत गेला, तसतसा त्याचा अभिनयाचा प्रवासही मोठ्या पडद्यावर सुरू झाला. "मोहिनी', "रघुपती राघव राजाराम', "हॉन्टेड हाउस' हे त्याचे सुरवातीचे काही चित्रपट. त्यानंतर आलेल्या "तुझी माझी लव्ह स्टोरी' या गाजलेल्या चित्रपटात त्याने साकारलेल्या "गोली' या मध्यवर्ती भूमिकेतून रसिकांच्या मनात त्याने स्थान निर्माण केलं.

"ओली माती', "एक गाव', "पाकीटमार' या चित्रपटांमध्ये त्याने मध्यवर्ती भूमिका साकारली. "लिव्ह इन लोचा' या हिंदी वेबसीरिजमधील त्याच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले. "हरिणी', "टिपऱ्या' व "मेकअप' या चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. आगामी काळात हा चार्मिंग हिरो मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.  विशेष म्हणजे संकेतने यंदा चित्रपटसृष्टीमध्ये 20 वर्षे पूर्ण केली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sanket More has completed his 20 years in cinema