Sayaji Shinde:"जेथे जीव वाचवता तेथे १५८ जीव घेण्याची परवानगी मिळतेच कशी?" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Sayaji Shinde against of cutting 158 tress in sion hospital mumbai

"जेथे जीव वाचवता तेथे १५८ जीव घेण्याची परवानगी मिळतेच कशी?"

हिंदी,मराठी,दाक्षिणात्य चित्रपटांतून सर्व क्षेत्रात महत्वाची भूमिका निभावणारा अभिनेता सयाजी शिंदे प्रेक्षकांना नक्कीच अपरिचित नाही.त्याच्या दमदार भूमिकेने सर्वांना त्याच्या अभिनयाचे कौतुक करावेसे वाटते.संजय शिंदेने जेवढी प्रखर भूमिका एक विलन म्हणून केली आहे तेवढीच प्रखर भूमिका त्याने चित्रपटात एका सभ्य माणसाच्या रूपात केली आहे.आता त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखिल तो चूकीच्या गोष्टींवर आवाज उठवताना दिसतोय.

सयाजी शिंदे(Sayaji Shinde) हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलताना दिसत आहे.क उत्तम अभिनेते असण्यासोबतच ते पर्यावरणप्रेमीही आहेत.अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रत्येकाला वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करत असतात.तसेच वृक्षतोडीवर ठामपणे बोलत असतात.नुकतंच मुंबईतील सायन रुग्णालयात वृक्षतोड होणार असल्याचे समजताच सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.एक पर्यावरणप्रेमी म्हणून त्यांनी त्यांच्या या वृक्षतोडीवर ठामपणे मत व्यक्त केले आहे.

अभिनेते सयाजी यांनी याबाबतची माहिती देतानाचा एक व्हिडिओ देखिल पोस्ट केला आहे.“ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं १५८ जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी?? याला दुसरा काहीच पर्याय सायन रूग्णालयाकडे नाही का? मला अपेक्षा आहे नव्या वसतिगृहासाठी झाडे तोडण्याचा निर्णय रूग्णालय मागे घेईल. आपल्या एका निर्णयामुळे असंख्य पक्षांची घरटी, त्यातले छोटे जीव वाचणार आहेत”, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.(Environment)

मुंबईतील प्रसिद्ध सायन रुग्णालयात तब्बल १५८ झाडे तोडण्यात येणार आहेत. रुग्णालयाजवळ असलेल्या डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी ही झाडे तोडली जाणार आहेत.त्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे.यातील दोन झाडे नुकतीच तोडण्यात आली आहे अशी माहितीही पुढे आली आहे.याबाबत माहिती मिळताच सयाजी शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे.

Web Title: Actor Sayaji Shinde Against Of Cuttings Trees In Mumbai Sion Hospitalshared A Video Against

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top