
शक्ती कपूर म्हणाले, वेळेसोबत मुलं मोठी होतात ते त्यांचा निर्णय घेण्यास समर्थ असतात. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे.
मुंबई - अभिनेता वरुण धवनचा लग्न सोहळा अलिबागमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. त्याच्या परिवारातील काही मोजक्या व्यक्ती लग्नाला हजर होते. कडेकोट बंदोबस्त आणि सुरक्षारक्षकांच्या पहा-यात हा लग्नसोहळा झाला. सोशल मीडियावरही वरुण आणि नताशाच्या लग्नाची चर्चा सुरु होती. आता अभिनेत्री श्रध्दा कपूरच्या लग्नाची गोड बातमी सगळीकडे येऊ लागली आहे.
श्रध्दा कपूरचे वडिल प्रख्यात अभिनेते शक्ती कपूर यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. श्रध्दा ही रोहन श्रेष्ठला डेट करत आहे. रोहन हा एक प्रसिध्द छायाचित्रकार आहे. रोहन आणि श्रध्दाची मैत्री आता प्रेमात रुपांतरीत झाल्याचे दिसून आले आहे. यावर अभिनेते शक्ती कपूर यांनीही टिप्पणी केली आहे. याविषयी टाईम्सला सांगताना शक्ती कपूर म्हणाले की, इंटरनेटवर काय चालले आहे याबद्दल मला काहीही माहिती नाही. मात्र मी नेहमीच श्रध्दाला सपोर्ट केला आहे. तिला ज्यावेळी माझी गरज वाटेल तेव्हा मी तिच्या पाठीशी उभा असेल. तिच्या लग्नालाही माझा पूर्ण पाठींबा असणार आहे. तिचं ज्या मुलावर प्रेम आहे त्याविषयी मला सांगितल्यास मी तिच्या निर्णयाच्या बाजूनं उभा राहील. यात शंका नाही.
रोहनविषयीही शक्ती कपूर यांनी सांगितले, रोहन चांगला मुलगा आहे. लहानपणापासून मी त्याला ओळखतो. श्रध्दा आणि तो लहानपणीचे मित्र आहेत. मात्र मला श्रध्दानं अजून सांगितले नाही की तिचा त्याच्याशी लग्न करण्याचा विचार आहे. मी रोहनचे वडिल राकेश यांनाही ओळखतो. आमचे चांगले संबंध आहे. आम्ही एकत्र काही शुट्स केले आहे. चांगले मित्र आहोत. श्रध्दा कपूरच्या करिअरविषयी शक्ती कपूर यांनी आनंद व्यक्त केला आहे. ती चांगले काम करत आहे.
तिच्या जन्मानंतर दोन वर्षांनी आई-वडिलांनी केलं होतं लग्न; शाळेत नाव बदलून जायची
चाहत्यांकडुन तिला पसंती मिळत आहे. याचे समाधान वाटते. ती आता अभिनेता रणबीर कपूर सोबत एक चित्रपट करत आहे. त्याबदद्ल मला तिचा अभिमान वाटतो. ज्यावेळी श्रध्दाच्या लग्नाचा विषय़ असेल तेव्हा ती तिचा जोडीदार निवडेल. तिला तो अधिकार आहे. वेळेसोबत मुलं मोठी होतात ते त्यांचा निर्णय घेण्यास समर्थ असतात. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे.