स्टार प्रवाहवर १० सप्टेंबरपासून सुरु होतोय नवा कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Siddharth Jadhav

स्टार प्रवाहवर १० सप्टेंबरपासून सुरु होतोय नवा कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा

स्टार प्रवाह : दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी स्टार प्रवाह वाहिनी १० सप्टेंबरपासून भेटीला घेऊन येतेय असाच एक भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’. नावाप्रमाणे हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा धिंगाणा असणार आहे. जेव्हा जेव्हा कुटुंब एकत्र येतं आणि विसाव्याचे काही क्षण मिळतात तेव्हा अंताक्षरी रंगल्याशिवाय रहात नाही.

स्टार प्रवाहचा हा नवा कोरा कार्यक्रम म्हणजे अंताक्षरीचा भन्नाट प्रयोग म्हणता येईल. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या या नव्या कार्यक्रमातही मराठी गाण्यांचा आस्वाद घेता येईल. स्टार प्रवाह परिवारातल्या दोन मालिकांच्या टीममध्ये ही अनोखी सांगितीक लढत रंगणार आहे. पण हा नुसता म्युझिकल कार्यक्रम नाही. तर बरेच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती जमती या मंचावर उलगडतील.

सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार असून तब्बल ११ वर्षांनंतर तो स्टार प्रवाहसोबत पुन्हा जोडला जातोय. या कार्यक्रमासाठी तो अतिशय उत्सुक असून अश्या पद्धतीच्या कार्यक्रमाची मी वाट पहात होतो असं सिद्धार्थ म्हणाला. या कार्यक्रमात म्युझिक आहे, मस्ती आहे आणि एक वेगळा धिंगाणा आहे. प्रेक्षकांचं वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करायला मला आवडतं. आता होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम म्हणजे फक्त गाण्याचा कार्यक्रम नाही तर यातल्या काही गोष्टी प्रेक्षकांना नवं सरप्राईज देतील. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपली छाप पाडणारा एक कार्यक्रम असावा.

हा कार्यक्रम त्याच धाटणीचा आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारा प्रवाह परिवार या शोला वेगळ्या उंचीवर नेतो. या सगळ्यांकडून नवी ऊर्जा मिळते. स्टार प्रवाह वाहिनीला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून प्रेम मिळत आहे. या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय.

त्यामुळे सिद्धार्थ जाधवची एनर्जी आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर होऊ दे धिंगाणा हा कार्यक्रम पाहायलाचा हवा. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहचा हा अनोखा आणि भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’ १० सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: Actor Siddharth Jadhav Coordination Star Stream Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..