esakal | Video: सेम टू सेम सिद्धार्थ शुक्ला, चाहते झाले भावूक
sakal

बोलून बातमी शोधा

Video: सेम टू सेम सिद्धार्थ शुक्ला, चाहते झाले भावूक

Video: सेम टू सेम सिद्धार्थ शुक्ला, चाहते झाले भावूक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टीव्ही मनोरंजन आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) याचं नुकतचं निधन झालं. त्याच्या जाण्यानं मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली होती. अद्याप त्याचे फॅन्स त्याच्या निधनाची गोष्ट विसरलेले नाहीत. अजूनही आपल्यात आहे ही भावना त्यांच्या मनात कायम आहे. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. ती व्यक्ती हुबेहुब सिद्धार्थ सारखी दिसत असल्याचा दावा चाहत्यांचा आहे. त्यामुळे त्यांनी आता त्यालाच आमचा सिद्धार्थ शुक्ला असल्याचे म्हटले आहे. आम्हाला तुझ्यात सिद्धार्थ दिसतो. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

अजूनही सिद्धार्थचे फॅन्स त्याचे जूने व्हिडिओ काढून त्याच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सोशल मीडिय़ावर सिद्धार्थच्या रियॅलिटी शो मधील वेगवेगळे व्हिडिओ व्हाय़रल झाले आहेत. त्याला त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळताना दिसत आहे. सध्या इंस्टावर सिद्धार्थ सारख्या व्यक्तीची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. त्याचे नाव चंदन असून त्यात प्रेक्षकांना सिद्धार्थची झलक दिसून आली आहे. त्यामुळे ते भावूक झाले आहेत. यापूर्वी देखील सिद्धार्थच्या वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सिद्धार्थ हा सोशल मीडिय़ावर अॅक्टिव्ह असणारा अभिनेता होता.

चंदन हा सिद्धार्थचा चाहता आहे. त्यानं जो व्हिडिओ केला आहे त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या त्या व्हिडिओला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याला निगेटिव्ह कमेंटही दिल्या आहेत. मात्र सिद्धार्थच्या निस्सीम चाहत्यांनी त्याचा उत्साह वाढवला आहे. तुच आमचा सिद्धार्थ शुक्ला आहेस अशी प्रतिक्रिया त्याला दिली आहे. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडिय़ावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यानं सिद्धार्थच्य़ा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चंदननं यावेळी शहनाज आणि सिद्धार्थचे काही व्हिडिओ आपल्या टाईमलाईनवर शेयर केले आहेत.

दोन सप्टेंबरला सिद्धार्थचं निधन झालं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला हदयविकाराचा धक्का बसला. त्यात त्य़ाचा मृत्यु झाला. चंदननं शेयर केलेल्या त्या व्हिडिओला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. त्यात एकानं कमेंट दिली आहे की, भावा तु, आम्हाला सिद्धार्थ शुक्ला वाटतो आहे. तर एकानं लिहिलं आहे की, सिद्धार्थची कॉपी करणं बंद कर. तु त्याच्या सारखा नाही.

हेही वाचा: 'सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यविधीचे व्हिडीओ लीक केले नाहीत'; संभावनाचं उत्तर

हेही वाचा: 'सिद्धार्थ शुक्ला हार्ट अ‍ॅटकनं गेलाच नाही, खरं कारण कळू द्या'

loading image
go to top