esakal | 'सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यविधीचे व्हिडीओ लीक केले नाहीत'; संभावनाचं उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

sambhavna sidharth

'सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यविधीचे व्हिडीओ लीक केले नाहीत'; संभावनाचं उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची Sidharth Shukla अकाली एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. सिद्धार्थच्या अंत्यविधीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सिद्धार्थच्या कुटुंबीयांचं सांत्वन केल्यानंतर माध्यमांना मुलाखती देण्यावरून अभिनेत्री गौहर खानने Gauhar Khan संताप व्यक्त केला होता. तर अभिनेता करण पटेलनेही Karan Patel सोशल मीडियाद्वारे राग व्यक्त केला. यावर आता अभिनेत्री संभावना सेठने Sambhavna Seth उत्तर दिलं आहे. सिद्धार्थच्या अंत्यविधीला हजेरी लावल्यानंतर संभावनाने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्लॉग पोस्ट केला होता. यावरूनच इतर सेलिब्रिटी तिच्यावर भडकले आहेत.

संभावना सेठचं स्पष्टीकरण-

संभावनाने ट्विटरवर काही लागोपाठ ट्विट्स केले आहेत. त्याने तिने म्हटलंय, 'आम्हा सेलिब्रिटींप्रमाणेच चाहत्यांनासुद्धा सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबीयांबद्दल, मित्रमैत्रिणींबद्दल जाणून घ्यायचं होतं. आत नेमकं काय घडतंय, हे जाणून घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. अंत्यविधीचे फोटो आणि व्हिडीओ लीक होत नसतील तर सर्वसाधारपणे तिथे काय घडलंय हे सोशल मीडियाद्वारे सांगण्यात काही गुन्हा नाही. मी आतील कुठलेही फोटो आणि व्हिडीओ लीक केले नव्हते. जे माझ्यावर टीका करून अतिशहाणपणा दाखवत आहेत, तेसुद्धा नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी सोशल मीडिया चेक करत असतीलच. तुम्ही तुमची ईर्षा बाजूला ठेवून आधी माझा पूर्ण व्लॉग बघा. त्यात मी कोणतेच फोटो, व्हिडीओ दाखवले नाहीत. इतरांवर सतत टीका करणं हे जसं तुमचं रोजचं काम आहे, तसंच व्लॉगिंग करणं हे माझं रोजचं काम आहे.'

हेही वाचा: बलात्कार प्रकरण: अक्षय, सलमानसह ३८ सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल

हेही वाचा: 'मला एकट्यात लांब कुठेतरी दफन करा'; सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर करण पटेलची पोस्ट

गौहर खानची टीका-

'सिद्धार्थच्या कुटुंबीयांचं सांत्वन केल्यानंतर बाहेर येऊन माध्यमांना त्यांच्याबद्दलची माहिती देत बसू नये. माध्यमांना मुलाखती देऊन त्याच्या कुटुंबीयांच्या बाबतीत माहिती देणाऱ्यांविषयी मला वाईट वाटतं. कृपया हे थांबवा. जर तुम्ही अंत्यविधीला गेला आहात तर बाहेर येऊन 'खबरी' बनू का', अशा शब्दांत गौहरने सुनावलं होतं.

करण पटेलने व्यक्त केला संताप-

'मी गेल्यानंतर मला लोकांच्या नजरेपासून लांब कुठेतरी एकट्यात दफन करा. कारण आजकाल लोक अंत्यविधीलाही प्रदर्शन करणं सोडत नाहीत', अशा शब्दांत त्याने सुनावलं होतं. तर 'आयुष्यभर मुखवटा घालून राहिले, एकाच्या निधनानंतर त्या सर्वांनी आपला खरा चेहरा दाखवला', असं त्याने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

loading image
go to top