पेशंटचा जीव वाचवता आला नाही, 'हेल्पलेस' झालोय... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor sonu sood

पेशंटचा जीव वाचवता आला नाही, 'हेल्पलेस' झालोय...

मुंबई - कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव यामुळे प्रशासकीय यंत्रणांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. युध्दपातळीवरुन कोरोनाला सामोरं जाण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. अशावेळी त्यांच्या मदतीला बॉलीवूडही धावून आले आहे. अनेक सेलिब्रेटींनी कोरोनाच्या काळात अत्यावश्यक वस्तु पुरवल्या आहेत. प्रसिध्द अभिनेता सोनू सूद (actor sonu sood ) त्याच्या मदतशील स्वभावासाठी सर्वश्रृत आहे. त्याने आतापर्यत हजारो जणांना कोरोनाच्या काळात मदतीचा हात दिला आहे. मात्र त्यादरम्यान त्याला जे काही अनुभव आले आहेत त्यामुळे तो कमालीचा दु:खी झाला आहे. सोशल मीडियावर त्यानं त्याविषयी लिहिलं आहे. (actor sonu sood felt helpless after not able to save a patients life)

एका रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले. यामुळे अभिनेता सोनु सुद (actor sonu sood felt helpless) नाराज झाला आहे. गरिबांचा तारणहार म्हणून सध्या त्याच्याकडे पाहिले जाते. लहान मुलांच्या शिक्षणासाठी, ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी, महिलांसाठी सोनूनं वेळोवेळी मदत केली आहे. लोकही त्याच्याकडे हक्कानं मदत मागतात. सोनू त्यांना कधीही नाराज करत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव पाहून तो कमालीचा भावूक झाला आहे.

सोनूनं आपल्या व्टिटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानं लिहिलं आहे की, ज्याला तुम्ही वाचविण्याचा प्रयत्न करत असता आणि अचानक त्याचा मृत्यु जर का झाला तर तुम्हाला कसे वाटेल असा प्रश्न सोनूनं विचारला आहे. त्याच्या फॅमिलीला मी कशाप्रकारे सामोरं जाऊ या भावनेनं कमालीचे वाईट वाटत आहे. अशावेळी मी स्वतला हेल्पलेस फील करतो आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सोनूनं (Sonu Sood Interview) सांगितले होते की, एका मुलीनं माझ्याकडे तिच्या आईसाठी मदत मागितली होती. मी ते केली. मात्र त्यानंतर काही दिवसांनी त्या आईचे निधन झाले. एक मुलगी तिच्या आईवर अंत्यसंस्कार करते दुसरीकडे पुन्हा तिच्या भावासाठी मदत मागते. कारण तिचा भाऊही आजारी होता. अशावेळी मी काय करणार, ही वेळ मला कमालीची अस्वस्थ करते. असेही सोनूनं सांगितलं.