Sonu Sood: पुन्हा काळजात घर! सोनू सुदची लोकल वारी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor sonu sood travel in local train video viral on social media

Sonu Sood: पुन्हा काळजात घर! सोनू सुदची लोकल वारी..

sonu sood: बॉलीवूडमध्ये सोनू सूद ही अशी व्यक्ती आहे की त्याचे कौतुक जितके करू तितके कमी आहे. कोरोना महामारीच्या काळात त्याने लोकांना जी मदत केली होती ते अद्यापही कोणी विसरू शकले नाही. आजही सोनू सूदची समाजसेवा सुरूच आहे. अनेक गरजूंना तो मदतीचा हात देत असतो. त्यामुळे त्याने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्याने चक्क अलिशान गाडी सोडून लोकल ट्रेनने प्रवास केला आहे.

(actor sonu sood travel in local train video viral on social media)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: अपूर्वाने धुव्वा उडवला! अक्षयचा केला घोडा, अमृता कोसळली..

सोनू अशा अभिनेत्यांपैकी एक आहे की पब्लिक त्याला तर रिअल लाईफचा हिरो मानतात. नुकताच त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये करोडोंची कमाई असूनही तो अजूनही त्याचे पाय किती जमिनीवर आहेत हे दिसून येते.

हेही वाचा: Aditya Roy Kapur: आदित्यला व्हायचं होतं क्रिकेटर, पण नशीब फिरलं आणि..

सोनूने त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो मुंबईची लाईफ म्हणजेच लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. सोनू ट्रेनमध्ये बसला आहे आणि खिडकी बाहेर पाहत आहे. यादरम्यान सोनू खोल विचारात दिसतो आहे. या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जीवन एक प्रवास आहे... छान प्रवास करा.'

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते सोनुच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले, 'रियल हिरो.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'सर तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात.' याशिवाय अनेक यूजर्स या व्हिडिओवर हार्ट इमोजीही शेअर करत आहे. प्रेमाचा वर्षाव केला आहे. सोनू सुद शेवटचा 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटात दिसला होता. त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर लवकरच शिव आचार्य यांच्या ‘कोर्तला’ या चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :sonu soodactor sonu sood