'बाळासाहेब, तुमची मराठी मुले...' अभिनेता सुबोध भावे काय म्हणतोय पाहा

subodh bahve on talk show
subodh bahve on talk show

मुंबई : कलाकारांच्या आयुष्यात नेमकं कसं असतं याचा खुलासा करणारा आणि त्यांच्याशी थेट गप्पांतून जीवनाविषयी जाणून घेणारा शो कर्लस मराठी वाहिनीवर सुरु झाला आहे. 'दोन स्पेशल' असं या कार्यक्रमाचं नाव असून सर्वांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी त्याचं सूत्रसंचालन करणार आहे. शोच्या पहिल्याच भागामध्ये एन्ट्री झाली ती सुबोध भावे आणि सुमीत राघवन यांची. या कार्यक्रमाच्या 'फोटो पे ऐसी बात' सेशनमध्ये सुबोध भावेने बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोमसोर आपलं मत व्यक्त केलं. मराठी माणूस, मराठी मुलांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी कायम लढणाऱे बाळासाहेव ठाकरे पण त्याच मराठी मुलांना कामचं करायचं नाही असं परखड मत यावेळी सुबोधने शोच्या माध्यमातून मांडलं. जाणून घ्या बाळासाहेबांच्या फोटोसमोर सुबोधने कोणती मतं व्यक्त केली.

सुबोध म्हणाला...

'बाळासाहेब मी पहिल्यांदा तुमचं भाषण ऐकलं होतं ते शनिवार वाड्यावरती. मला असं वाटतं तुमचं ते भाषण नव्हतचं, तुम्ही गप्पा मारायचा लोकांशी. तुम्हाला तुमची माणसं कोण आहेत, आणि त्यांच्याशी कुठल्य़ा भषेत बोललं पाहिजे हे अगदी अचुक माहित होतं. त्याचवेळी पक्षाने शिवउद्योग सेनेची स्थापना केली होती. शिवसेनेने शिवउद्योग सेनेची स्थापना केली होती. मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि नोकरीही करत होतो. वेगवेगळ्या नोकऱ्या करताना मी एक दिवस शिवउद्योग सेनेमध्ये नोकरी करु लागलो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाणं आणि आपल्याकडे ज्या मराठी मुलांनी अर्ज भरला आहे त्या मुलांना तिकडे पाठवणं. त्यासाठी अनेक इंडस्ट्रीजमध्ये तेव्हा फिरत असे. शिवउद्योग सेनेत ज्यांनी अर्ज केला आहे अशा मुलांना कोणत्या कंपनीत नोकरी लागते आहे ना? हे बघायचं काम मी करत असे.'

पुढे सुबोध म्हणाला, 'त्यावेळी मला वाटतं असे की, बाळासाहेब तुम्हाला पत्र लिहावं आणि मनातल्या भावना सांगाव्या. त्या काळात मला असं वाटायचं की जी परिस्थिती मी खूप जवळून बघितली होती ती परिस्थिती तुम्हाला पत्राद्वारे कळवावी. ज्या मराठी मातीसाठी, ज्या महाराष्ट्रातल्या तरुण मुलांसाठी तुम्ही हे सगळं करत आहात त्यांना मुलांना कामच करायचं नाही. आज मराठी माणसांना नोकरी मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न केलेत. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्यांना ७०-८० टक्के जागा ठेवल्या. तुम्ही मराठी कलाकार, मराठी नाटक, मराठी चित्रपट यांसाठी हक्काने उभे राहिलात. त्या मुलांना कामचं करायचं नाही. तुम्ही एकट्याने स्वप्न बघून काय फायदा जर त्यांना ती स्वप्न पूर्ण करायची नसतील.'

पण एक शब्द देतो, आता वेळ आमची आहे. तुमच्या स्वप्नाप्रमाणे महाराष्ट्राला प्रत्यक्ष सत्ताय  उतरवून दाखविल्याशिवय राहणार नाही. इतक्या वर्षातल्या मनातल्या भावना सुबोधने कार्यक्रमातील 'फोटो पे ऐसी बात' या सेशनमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर बोलून दाखविल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com