Sunil Holkar Passes Away | 'तारक मेहता..' फेम अभिनेता सुनिल होळकर यांचे निधन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tarak Mehta actor Sunil Holkar passes away

Sunil Holkar Passes Away: 'तारक मेहता..' फेम अभिनेता सुनिल होळकर यांचे निधन..

नाटक, मालिका, चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून मनोरंजन करणाऱ्या अभिनेता सुनिल होळकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

त्यांनी केलेले 'मोरया' चित्रपटातील काम आणि 'तारक मेहता का उलटा चश्मा' मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. (actor Sunil Holkar passes away death)

सुनिल लिव्हर सोरायसिस या दुर्धर आजाराने ते त्रस्त होते. अनेक उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

हा आजार असा आहे ज्यामध्ये कधीही शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काल पर्यंत ते ठीक होते, आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी एक मूल असा परिवार आहे.

actor Sunil Holkar passes away death

'गोष्ट एका पैठणीची', 'मोरया' या सारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चमक दाखवली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा', 'मॅडम सर', 'मि. योगी' अशा अनेक मालिकांतून तर 'भुताटलेला' वेब सिरीज मधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत त्यांनी बरीच वर्षे काम केलं. अभिनेता, निवेदक अशी त्यांची ख्याती होती. जवळपास 15 वर्षांहून अधिक काळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली.

हेही वाचा: Tarak Mehta Birth Anniversary: मालिके मागचे खरे 'तारक मेहता' कोण हे माहितीय? वाचा सविस्तर