esakal | रिहानाच्या ट्विटवर 'लक्ष्मण' भडकला, म्हणाला...
sakal

बोलून बातमी शोधा

actor Sunil lehri aka Ramayana Lakshman on Rihanna tweet on farmers protest

रिहानानं शेतक-यांच्या आंदोलनाविषयी व्यक्त केलेलं मत हे सुनील यांच्या रोषाचे मुख्य कारण आहे.

रिहानाच्या ट्विटवर 'लक्ष्मण' भडकला, म्हणाला...

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - शेतकरी आंदोलनावर परदेशी सेलिब्रेटींनी बोलायला सुरुवात केल्यापासून सगळ्यांचे लक्ष पुन्हा शेतकरी आंदोलनाकडे गेले आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीत कडाक्याच्या थंडीत आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना सरकारनं अद्याप न्याय दिला नाही. यामुळे आक्रमक झालेल्या शेतक-यांनी प्रजासत्ताक दिनी मोठा गदारोळ केला होता. याचे पडसाद जगभर सोशल मीड़ियाच्या माध्यमातून उमटले गेले. अमेरिकेतील प्रसिध्द गायिका रिहानानंही शेतक-यांच्या बाजूनं घेतलेली भूमिका अनेकांच्या टीकेचा विषय ठरली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

अभिनेत्री कंगणानं रिहानावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. आता रामायणात लक्ष्मणाची भूमिका करणा-या सुनील लहरी यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. रिहानानं शेतक-यांच्या आंदोलनाविषयी व्यक्त केलेलं मत हे सुनील यांच्या रोषाचे मुख्य कारण आहे. सुनील आणि रिहाना यांच्यातील या शाब्दिक युध्दाला सोशल मीडियावर चांगली प्रसिध्दी मिळत आहे. दोघांच्या समर्थकांनी त्यावर मते नोंदवली आहेत. शेतकरी आंदोलनावर परदेशी सेलिब्रेटींना आलेला प्रेमाचा उमाळा हा केवळ दिखावा असल्याच्या प्रतिक्रिया यापूर्वी काही मान्यवरांनी दिल्या आहेत. त्यात रिहानाच्या प्रतिक्रियेनं देशातील महत्वाच्या व्यक्तिचं लक्ष त्याकडे गेले होते. सुनील यांनी रिहानाच्या या व्टिटला जशास तसे उत्तर दिले आहे.

टेलिव्हीजनवरुन प्रसारित होणा-या रामायण मालिकेतील लक्ष्मणच्या भूमिकेत असणारे सुनील लहरी चर्चेत आले आहेत. त्यांनी केवळ रिहाना नाही तर त्या सर्व सेलिब्रेटींना चपराक दिली आहे ज्यांनी शेतक-यांच्या आंदोलनाच्या बाजूनं भूमिका घेतली होती. लहरी यांनी लिहिले आहे की, मुळातच रिहाना आणि तिच्यासारखे असे अनेक सेलिब्रेटी यांनी आमचा शेतकरी आणि त्याच्याशी संबंधित प्रकरणात लक्ष देण्याची काही गरजच नाही. ते त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सक्षम आहेत. सुनील यांच्या अगोदर रामायण मालिकेत रामाची भूमिका करणा-या अरुण गोविल यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती.

हेही वाचा : सिद्धार्थ-मिताने लग्नानंतर निवडलं महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण, जाणून घ्या किंमत

26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या शेतक-यांच्या गदारोळामुळे त्याचा वेगळा संदेश सा-या जगभर गेला होता. त्यावरुन देशाची बदनामी झाल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. त्यावरुन अनेक परदेशी कलावंतांनी घेतलेली भूमिका हा एकप्रकारच्या प्रपोगंडाचा भाग असल्याची टीका सेलिब्रेटींनी केली होती. 
 

 
 
 

loading image