esakal | माधुरी दीक्षितच्या पहिल्या हिरोचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Actor Tapas Pal Passed away

माधुरी दीक्षितच्या पहिल्या हिरोचे निधन

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

 मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला सिनेमा ‘अबोध’चा नायक तापस पॉल यांचे आज हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

कादंबरीतून उलगडलं कोरोनाचं हे धक्कादायक रहस्य!

मुंबईहून कलकत्तामध्ये परतत असताना त्यांना मुंबई विमानतळावर छातीमध्ये वेदना होऊ लागल्या. लगेचच त्यांना जुहू येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आज पहाटे चारच्या सुमारास तापस ह्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. गेले दोन वर्ष तापस ह्यांच्यावर उपचार सुरूच होते. आज संध्याकाळी कलकत्त्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

दादा किर्ती हा त्यांचा पहिला बंगाली चित्रपट. तापस ह्यांनी साहेब, प्रभात प्रिया, भालोबासा-भालोबासा, अनुरागेर छोआं, आमार बॉन्धोन अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. बंगाली चित्रपटान बरोबरच बॉलिवूडमध्येही त्यांनी काम केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तसेच तृणमूल काँग्रेसमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मधून ते निवडून आले. आणि थेट लोकसभेत पोहोचले होते

loading image