esakal |  'मला स्पायडर मॅनची भूमिका करायला आवडेल'
sakal

बोलून बातमी शोधा

actor tiger shroff want to play role of Spiderman answer to fans question

टायरगनं त्याच्या चाहत्यांना कुठलाही एक प्रश्न विचारण्याची परवानगी दिली होती. त्यावर चाहत्यानं त्याला तुझी आवडती भूमिका कुठली असा प्रश्न विचारला होता.

 'मला स्पायडर मॅनची भूमिका करायला आवडेल'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अॅक्शन, डान्स, अभिनय, स्टंटबाजी यात प्रसिध्द असे अनेक कलाकार बॉलीवूडमध्ये आहेत. 80 च्या दशकात मिथून, त्यानंतर अजय देवगण, अक्षय कुमार, आता विद्युत जामवाल, ऋतिक रोशन, जॉन अब्राहम यांची नावे घ्यावी लागतील. याच्या जोडीला आणखी एकाचे नाव सांगावे लागेल. अल्पावधीत त्या कलाकारानं सर्वांची मने जिंकून घेतली. आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी कमालीचे कष्ट घेणा-या त्या कलाकाराला त्याच्या चाहत्यांनी एक प्रश्न विचारला होता.

टायगर श्रॉफला त्याच्या अॅक्शनमुळे अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या आहेत. अभिनयाच्या बाबत तो थोडा कच्चा असला तरी त्याने ती उणीव डान्स आणि अॅक्शनमध्ये भरुन काढली आहे. सोशल मीडियावर त्याला एक प्रश्न त्याच्या चाहत्यांनी विचारला आहे. तुला हॉलीवूडमध्ये कोणती भूमिका करायला आवडेल ्सा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर त्यानं दिलेलं उत्तर मोठे मजेशीर आहे. तो म्हणाला मला स्पायडर मॅन व्हायला आवडेल. त्याचे चित्रपट मला फार आवडतात. ती माझी आवडती भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी टायगरचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात त्याने केलेल्या डान्सवर ऋतिकनं कमेंट दिली होती. याचा टायगरला खूप आनंद झाला होता.

टायरगनं त्याच्या चाहत्यांना कुठलाही एक प्रश्न विचारण्याची परवानगी दिली होती. त्यावर चाहत्यानं त्याला तुझी आवडती भूमिका कुठली असा प्रश्न विचारला होता. यापूर्वी टायगरनं 'द फ्लाइंग जट्ट' मध्ये काम केले होते. वास्तविक तो चित्रपट काही चालला नाही. मात्र त्याच्या त्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतूक झाले होते. भारतीय चित्रपटांमध्ये सुपरहिरोची भूमिका करणारे फार कमी अभिनेते आहे. ऋतिक रोशनचे यात नाव येते. क्रिश भाग 1,2 यांचा उल्लेख त्यात करावा लागेल. टायगरनं #AskTiger नावाने प्रश्नोत्तरांसाठी एक वेगळा प्रयोग सुरु केला आहे. त्यात त्याला चाहते प्रश्न विचारतात. तो त्या प्रश्नांची उत्तरे देतो. आपल्याला लहानपणापासून मार्वलचे हिरो आवडत आले आहेत. त्या चित्रपटांमध्ये मला काम करण्याची इच्छा आहे.

 साजिदनं जियाला सांगितले होतं ' तुझा टॉप उतरव'

टायरगनं व्टिट केले आहे की, मला हे सांगणे फार अवघड आहे की मला कोणत्या प्रकारचे मुव्ही जास्त आवडतात. मला नेहमी खंत वाटते ती म्हणजे आपण हॉलीवूडच्या धर्तीवर वेगळे असे चित्रपट का बनवू शकत नाही याची. टायगरनं बागी 3 मध्ये रॉनीची भूमिका साकारली होती. त्याच्या आगामी येणा-या चित्रपटाची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. मात्र त्याची कुठलीही जाहीर घोषणा करण्यात आलेली नाही. 

loading image