उमेश - प्रियाचं 'बचपन का प्यार' चर्चेत, व्हिडिओ व्हायरल

'बचपन का प्यार' हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
उमेश - प्रियाचं 'बचपन का प्यार' चर्चेत, व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील सहदेव दिर्दो या मुलाने गायलेल्या 'बचपन का प्यार' या गाण्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या गाण्यावर अनेक सेलिब्रिटी 'इन्स्टा रिल' व्हिडीओ तयार करत आहे. नुकताच अभिनेता उमेश कामत (umesh kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापटने (priya bapat) देखील या गाण्यावरील व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करून उमेशने त्याला कॅप्शन दिले, 'बचपन का प्यार…आणि काय हवं ?' दोघांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(actor umesh kamat and actress priya bapat share video on song bachpan ka pyaar)

उमेश आणि प्रियाच्या या व्हिडीओला अनेक कलाकरांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री मिथिला पालकरने उमेश आणि प्रियाच्या व्हिडीओला ‘क्यूट’ अशी कमेंट केली आहेत. तर अमृता खानविलकरने कमेंट केली, 'अरे बापरे ..मला विश्वास बसत नाही, तुम्ही लोकांनी हे केलं.' प्रिया आणि उमेशच्या 'आणि काय हवं' या वेब सीरिजचा तीसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमधील साकेत ही भूमिका उमेशने तर प्रियाने जूई ही भूमिका साकारली आहे.

उमेश - प्रियाचं 'बचपन का प्यार' चर्चेत, व्हिडिओ व्हायरल
रितेशला चक्क ८ वेळा धरावे लागले बायकोचे पाय?

उमेश आणि प्रियाने शेअर केलेल्या व्हिडीओमधील 'बचपन का प्यार' हे व्हायरल झालेले गाणे सहदेवने गायले आहे. सहदेवचा हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. दोन वर्षानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. एका मुलाखतीत सहदेवने सांगितले होते की त्याचे वडील शेतकेरी आहेत. त्याच्या घरी टीव्ही, मोबाईल नसल्याचं त्याने सांगितलं. मोठं झाल्यावर गायक होण्याची इच्छा सहदेवने व्यक्त केली होती.

उमेश - प्रियाचं 'बचपन का प्यार' चर्चेत, व्हिडिओ व्हायरल
'आयुष्यातील महत्त्वाचा क्षण'; स्मिता तांबेचं डोहाळे जेवण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com