'आयुष्यातील महत्त्वाचा क्षण'; स्मिता तांबेचं डोहाळे जेवण

स्मिताने नुकताच तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'आयुष्यातील महत्त्वाचा क्षण'; स्मिता तांबेचं डोहाळे जेवण

मराठी मालिका आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबेच्या (smita tambe) घरी लवकर चिमुकल्या पाहूण्याचे आगम होणार आहे. स्मिताने नुकताच तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये फुलवा खामकर(Phulwa Khamkar), अभिनेत्री रेशम टिपणीस(Resham Tipnis), अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar) आणि अमृता संत (Amruta Sant) या सर्वजणी तिला फुलांच्या दागिन्यांनी सजवताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये स्मिताचे पती विरेंद्र द्विवेदी आणि तिच्या मैत्रिणी ‘गं कुणी तरी येणार येणार गं’ या गाण्यावर डान्स करत आहेत.(actress smita tambe share video of dohale jevan function)

स्मिताने डोहाळे जेवण्याच्या कार्यक्रमासाठी हिरवी साडी आणि लाल रंगाचे फुलांचे दागिने असा लूक केला असून ती या व्हिडीओमध्ये मैत्रिणींसोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडीओला स्मिताने कॅप्शन दिले,'आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण. यावेळी जेव्हा तुमच्या मैत्रिणी अचानक तुमच्या घरी सरप्राइज द्यायला येतात' स्मिताने १८ जानेवारी २०१९ रोजी विरेंद्र द्विवेदीसोबत लग्नगाठ बांधली. विरेंद्र यांच्यासोबतचे फोटो स्मिता नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.

'आयुष्यातील महत्त्वाचा क्षण'; स्मिता तांबेचं डोहाळे जेवण
प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या तापसीने फ्लॉप चित्रपटाने केली सुरुवात

मराठी चित्रपटांबरोबरच स्मिताने हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ‘सिंघम रिर्टन्स’, ‘रुख’, ‘नूर’, ‘डबल गेम’ या हिंदी चित्रपटांमध्ये स्मिताने महत्वपूर्ण भूमिका साकारली. स्मिताच्या ‘लाडाची लेक गं’ या मालिकेमधील मधील ‘मम्मी’ या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘तुकाराम’, ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘परतु’, ‘गणवेश’ या मराठी चित्रपटांमध्ये स्मिताने काम केले आहे

'आयुष्यातील महत्त्वाचा क्षण'; स्मिता तांबेचं डोहाळे जेवण
Friendship Day 2021: 'ही दोस्ती तुटायची नाय'; बॉलिवूडमधील BFF

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com