विद्याधर जोशींची 'अष्टवक्र'मधून खास झलक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

हिंदी मराठी चित्रपट सृष्टीत सकस अभिनयाने ठसा उमटविणारे अभिनेते विद्याधर जोशी येत्या ८ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'अष्टवक्र' सिनेमात एक प्रामाणिक निवृत्त पोलीस अधिकारी आणि नायिकेचे वडील या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. या हरहुन्नरी आणि गुणी अभिनेत्याच्या अभिनय क्षमतेबद्दल वेगळ सांगायला नको.

या भूमिकेविषयी जोशी म्हणाले, 'अष्टवक्र' सिनेमाच्या कथानकाचं गांभीर्य मला अपील झालं. तसच माझ्या भूमिकेत सुद्धा वेगळेपणा होता. खरंतर मराठीत पूर्णपणे सामाजिक विषयावर चित्रपट कमीच निघतात आणि तसा प्रामाणिक प्रयत्न कोण करत असेल तर त्यात आपला सहभाग नोंदवण्याची मला संधी मिळाली. मूळ प्रवाहापासून विभक्त असलेल्या समाजाचं नेमकं मूळ या सिनेमात मांडलं आहे. माणसाच्या जडण घडणीत कुटुंब आणि समाज महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. मात्र आजही समाजात विकृत, मानसिक संतुलन घालवलेली माणसं जगत आहेत. ज्यांना अपराधी किंवा गुन्हेगार असं थोडक्यात बोलून सगळेच मोकळे होतात. पण जन्मतः अशी माणसं अपराधी म्हणून जन्माला येतात का? त्यांना या गुन्हेगारी जगात कोण आणतं? हे संस्कार त्यांच्यावर कुठे होतात? या सारख्या बऱ्याच गोष्टींची उकल 'अष्टवक्र' सिनेमात होणार आहे.

गरोदर असताना अटक झालेल्या महिला कैदींची आणि तिथेच जन्माला येणाऱ्या मुलांची ही कहाणी आहे. लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद अशी सर्वव्यापी जबाबदारी प्रदीप साळुंके यांनी सांभाळली असून वरुणराज साळुंके यांनी निर्मिती केले आहे. 

Web Title: actor vidhyadhar joshi in film ashtawakra in different role