esakal | टीव्ही कलाकार म्हटल्यावर कुणी काम देईना, दोन वर्षांपासून घरात
sakal

बोलून बातमी शोधा

actor vivek dahiya

टीव्ही कलाकार म्हटल्यावर काम देईना, दोन वर्षांपासून घरात

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनामुळे (corona pandemic) गंभीर परिस्थिती असताना आता सर्वसामान्य व्यक्तींपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बदलते आहे. आता यात मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनाही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. यापूर्वी अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर (celebrity share post on social media) याबाबत पोस्ट लिहून आपल्याला कशाप्रकारे आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे याविषयी सांगितले आहे. टीव्ही क्षेत्रातील प्रसिध्द अभिनेता विवेक दाहियाला सध्या पैशांची चणचण भासत आहे. त्यानं त्याबाबत सांगितले आहे. कोरोनानं रोजच्या जगण्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. (actor vivek dahiya quit television share his struggle to essay role in films)

विवेकचं (actor vivek dahiya ) नाव हे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रसिध्द आहे. तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारा सेलिब्रेटी आहे. त्याचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. मात्र सध्या तो अडचणीत आला आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे कोरोनामुळे त्याच्याकडे कुठलाही प्रोजेक्ट नाही. मोठ्या आर्थिक समस्येला त्याला सामोरं जावं लागत आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं आपल्याला इंडस्ट्रीमध्ये कुठल्या समस्येला सामोरं जावं लागत आहे हे सांगितले आहे.

विवेकनं ये है आशिकी, ये है मोहब्बते, कवच आणि कयामत की रात जैसे सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र त्याने आता टीव्ही इंडस्ट्री सोडून चित्रपटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटात नवीन कलाकार म्हणून येण्यापेक्षा मालिकांच्या क्षेत्रात टिकाव धरणं कठीण आहे. गेल्या दोन वर्षांपासून विवेक बॉलीवूडमध्ये येण्याची तयारी करतो आहे. आपल्याला चित्रपट क्षेत्रात यायचे होते. अनेक वर्षांपासून त्याची तयारी करत होतो मात्र संधी आली नाही.

हेही वाचा: 'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमी 'या' अभिनेत्याला करतेय डेट?

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील 'गडा इलेक्ट्रॉनिक्स' झालं पर्यटनस्थळ

ज्यावेळी आपण चित्रपटामध्ये जाणार असल्याची चर्चा टीव्ही क्षेत्रात सुरु झाली तेव्हापासून मला मालिकांमध्ये काम मिळण्याची बंद झाली. आता टीव्ही अॅक्टर म्हटल्यावर कुणीही काम द्यायला तयार होत नाही. हे वास्तव आहे. त्याचा मी अनुभव घेतला आहे. यासगळ्या कारणांमुळे मला कोणी काम द्यायला तयार नाही. हे जेव्हा ऐकतो तेव्हा चिडचिड होते. असेही विवेकनं ( actor vivek dahiya ) यावेळी सांगितले.