विवेकला पुन्हा आठवली ऐश्वर्या; केले 'हे' वादग्रस्त ट्विट

सोमवार, 20 मे 2019

काल जाहीर झालेल्या एक्झिट पोलशी साधर्म्य साधत विवेकने या फोटो कोलाजमध्ये सलमान-ऐश्वर्याच्या फोटोला 'ऑपिनियन पोल', त्याखाली विवेक-ऐश्वर्याच्या फोटोला 'एक्झिट पोल' आणि त्याखाली ऐश्वर्या-अभिषेक-आराध्याचा फोटोला 'रिझल्ट' असे ट्विट केले आहे. 

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयने आज लोकसभा व आपले वैयक्तिक आयुष्य यावर भाष्य करत एक धक्कादायक ट्विट केले आहे. विवेकने एक फोटो कोलाज शेअर केला आहे, त्यात तो स्वतः, ऐश्वर्या राय, सलमान खान, अभिषेक बच्चन व आराध्या असे सर्व आहेत. या फोटोला एक हटके कॅप्शन देत विवेकने हो फोटो शेअर केलाय.

काल जाहीर झालेल्या एक्झिट पोलशी साधर्म्य साधत विवेकने या फोटो कोलाजमध्ये सलमान-ऐश्वर्याच्या फोटोला 'ऑपिनियन पोल', त्याखाली विवेक-ऐश्वर्याच्या फोटोला 'एक्झिट पोल' आणि त्याखाली ऐश्वर्या-अभिषेक-आराध्याचा फोटोला 'रिझल्ट' असे ट्विट केले आहे. 

हा असा फोटो कोलाज शेअर करत विवेकने त्याला, 'हा हा, क्रिएटीव्ह, येथे कोणतेही राजकारण नाही' असे कॅप्शन दिले आहे. विवेकने असा फोटो शेअर केल्यामुळे त्याची जोरदार चर्चा होतीय.. आणि त्याने असा फोटो कसा काय शेअर केला या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच या ट्विटवर अनेक मजेशीर कमेंट्सही आल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Vivek Oberoi tweets a controversial photo