अमिषा पटेलची वेबविश्वात एन्ट्री; दुबईला होणार वेबसीरीजचे शूटिंग

संतोष भिंगार्डे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

गौरांग दोशी प्रॉडक्शन हाऊसची ही वेबसीरीज म्हणजे क्राईम थ्रिलर आहे. 'सेव्हन्थ सेन्स' असे तिचे नाव आहे. करण दारा दिग्दर्शक आहेत. अमिषा पटेलसह प्रतीक बब्बर, आर. माधवन, चंकी पांडे, रोनित रॉय आदी कलाकारही काम करीत आहेत.

मुंबई : 'कहो ना...प्यार है' या चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. या चित्रपटात तिची आणि हृतीक रोशनची जोडी छान जमली होती. त्यानंतर तिने काही चित्रपट केले असले तरी ते फार काही गाजले नाही. चित्रपटसृष्टीपासून बरेच दिवस झाले दूर असलेली अमिषा पटेल आता वेबविश्वात पदार्पण करीत आहे. 

सदनिकेतील गळतीसाठी चक्क महापालिकेने बजावली नोटीस; याप्रकारची पहिलीच घटना...

गौरांग दोशी प्रॉडक्शन हाऊसची ही वेबसीरीज म्हणजे क्राईम थ्रिलर आहे. 'सेव्हन्थ सेन्स' असे तिचे नाव आहे. करण दारा दिग्दर्शक आहेत. अमिषा पटेलसह प्रतीक बब्बर, आर. माधवन, चंकी पांडे, रोनित रॉय आदी कलाकारही काम करीत आहेत. या वेबसीरीजचे चित्रीकरण दुबई आणि अबुधाबी येथे होणार आहे. 

तब्बल चार महिने त्यांनी प्रतिक्षा केली; अखेर फोन आला आणि ते गावी परतले...

1 ऑगस्ट रोजी पंधरा जणांचे युनिट दुबईला चित्रीकरणासाठी रवाना होत आहे. अमिषाची पहिलीच वेबसीरीज असल्याने ती खूप उत्सुक झाली आहे. ती म्हणते, की हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी नवीन आहे आणि मी खूप एन्जॉय करणार आहे. प्रेक्षकांनी मला आतापर्यंत भरभरून प्रतिसाद दिला आणि यापुढेही देतील, अशी आशा आहे.
---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress amisha patel will enter in webworld, shooting will start at dubai..