'स्वार्थासाठी लोकांचा आणि डॉक्टरांचा अपमान संतापजनक'

रामदेव बाबा यांनी पुन्हा एक व्टिट करत डॉक्टरांवर पुन्हा टीका केली आहे.
Ramdev Baba
Ramdev Baba Team esakal

मुंबई - योगगुरु रामदेव बाबांच्या (yog guru ramdev baba) त्या डॉक्टरविषयक वक्तव्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेव बाबा यांना माफी मागण्याचे आणि त्यांचे वक्तव्य मागे घेण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावर रामदेव बाबा यांनी पुन्हा एक व्टिट करत डॉक्टरांवर पुन्हा टीका केली आहे. त्यांनी आपल्या व्टिटमधून 25 प्रश्न डॉक्टरांना विचारले आहेत. त्यामुळे चिडलेल्या आयएमनं आता त्यांच्यावर एक हजार कोटींचा दावा दाखल केला आहे. बॉलीवूडची अभिनेत्री आणि शिवसेनेच्या उर्मिला मातोंडकर (actress and politician urmila matondkar ) यांनी रामदेव बाबांवर टीका केलीय. (actress and politician urmila matondkar Criticized baba ramdev tweet against allopathy )

उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) यांनी जे व्टिट केले आहे त्यातून त्यांनी परखड शब्दांत रामदेव बाबांवर टीका केली आहे. एक दोन दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांच्या त्या व्टिटमुळे देशात गोंधळ सुरु झाला आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या स्तरातून टीका होताना दिसत आहे. त्यात आयएमएनं त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. वास्तविक देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर नरमाईचे धोरण बाबा रामदेव घेतील अशी अपेक्षा अनेकांची होती. मात्र त्याच्या विरोधात पुन्हा ते सोशल मीडियावर (social media) अॅक्टिव्ह झाले आहेत.

urmila matondkar news
urmila matondkar newsteam esakal

देशात आतापर्यत कोरोनाचे जे मृत्यु झाले आहेत. त्यापैकी अधिक मृत्यु अॅलोपॅथीचे (allopathy) उपचार घेणा-यांमुळे झाले आहेत. असे विधान बाबा रामदेव यांनी केले होते. त्यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्याचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर उमटले. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला सुरुवात झाली. बॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शकत हंसल मेहता (hansal mehata) यांनी देखील रामदेव बाबांवर जोरदार टीका केली होती. त्यांनी रामदेव यांना मुर्ख व्यक्ती असे संबोधले होते.

Ramdev Baba
Shruti Haasan : 'बरं झालं आईबाबांनी घटस्फोट घेतला'
Ramdev Baba
KRK विरोधात सलमानने केला मानहानीचा दावा; 'राधे'वर टीका करणं पडलं महागात

आता उर्मिला यांनी योगगुरु रामदेव बाबांवर परखड शब्दांत टीका केली आहे. त्या म्हणाल्या, निव्वळ वैयक्तिक स्वार्थाकरता कोविडच्या भयानक महामारीत लोकांची दिशाभूल आणि डॉक्टर्सचा असा अपमान संतापजनक आणि निंदनीय आहे. अशा शब्दांत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com