Deepali Sayyad:तुम्हारे कार्यकर्ताओंको धरपकड्या है, उसमे अमित ठाकरे को वगळ्या है.. दीपालीचा सय्यदचा मनसेला टोला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Deepali Sayyad again tweeted on manse members

"....उसमे अमित ठाकरे को वगळ्या है" दीपालीचा सय्यदचा मनसेला टोला

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात.त्या सोशल मीडियावर व्हि़डिओज आणि फोटोज शेअर करत त्यांचे परखड मत मांडत असतात.मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या गेल्या काही भाषणातल्या वक्तव्यामुळे फार चर्चेत आले आहेत.ते भाजपासोबत युवती करणार की काय अशा चर्चांनाही वाचा फुटली होती.तर एकीकडे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर टिका केली जात आहे.(Raj Thackeray)आता यात भर टाकत दीपाली सय्यदने देखिल एक पोस्ट टाकली आहे.

दीपाली सय्यदने तीच्या ट्विटर अकाऊंटला ही पोस्ट शेअर केली आहे.या ट्वीटमधे त्या म्हणाल्या , "तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको".या ट्वीटमधे त्यांनी रााज ठाकरे,मनसे अधिकृत आणि शिवसेनेला मेंशन केले आहे.या ट्वीटला अनेकांच्या प्रतिक्रिया उमटलेल्या दिसते.(Social Media)एकाने तर "तीन चार वर्षाने मला नाही वाटत ही पार्टी टीकेल,राजू पेंटर असेल बीजीपीच्या चाकरीत आणि पोरगा असेल फुकट घरी बसलेला", अशी तुफान प्रतिक्रिया दिली आहे.तर एकाने "लायकीत राहावे माणसाने,आपण कोण आहोत याचे अलीकडे भान राहिलेले नाही", (Amit Thackeray)अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दीपाली सय्यद आता अभिनेत्रीपण सोडून राजकारणात उतरलेली दिसते.याआधीही दीपालीने केलेल्या महागाईच्या ट्वीटने चर्चेला उधाण आले होते."मोदिंना खुष करीण्याकरीता जिवाच रान करणाऱ्या राजसाहेबांनी आयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही".या त्यांच्या ट्वीटनेही चर्चांना वेग आला होता.

Web Title: Actress And Shivsena Member Deepali Sayyad Tweet On Amit Thackeray Taunt To The Manse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top