सुशांतच्या मृत्यूनंतरच्या काळावर अंकिता झाली व्यक्त,म्हणाली 'विकीच्या जागी कोणी..'

या जोडीच्या नात्याला सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक स्तरांतून जावं लागलं.
Ankita Lokhande openup on sushant singh's death after situation
Ankita Lokhande openup on sushant singh's death after situationesakal

पवित्र रिश्ता मालिकेच्या सिरियल कपल पासून ते रीयल लाईफ कपलपर्यंत सुशांत आणि अंकिताची जोडी सोशल मीडियात हिट होती.मात्र काही कारणाने का होईना सुशांत आणि अंकिताचं बिनसलं आणि ते वेगळे झाले.२०१८ मधे हे जोडपं वेगळं झालं असलं तरी २०२० मधे सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर अंकिताला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या ट्रोलींगला सोमोरं जावं लागलं होतं.

स्टार प्लस वाहिनीवर नुकतंच अंकिता आणि विकीला स्मार्ट जोडी म्हणून घोषित केलं गेलं.या जोडीच्या नात्याला सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक स्तरांतून जावं लागलं.(Sushant singh rajput)एका मुलाखतीत बोलताना अंकिता म्हणाली,"सुशांतच्या निधनानंतर मला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केल्या गेलं.सुशांतसाठी अंकिताच बेस्ट होती,तिने सुशांतबरोबरच राहायला हवं होतं असे लोक त्यावेळी म्हणत असत.तर अनेकांनी विकीवर टीका केली.अंकिताला सोडून जाण्याचे सल्ले दिले."

पुढे ती म्हणते, "आपल्या एक्स बॉयफ्रेंडविषयी टेलिव्हिजनवर व्यक्त होणं कोणालाच आवडलं नसतं.पण त्यावेळी सुशांतविषयी दररोज नवी माहिती पुढे यायची आणि सतत त्याच्याविषयी बोलायची.(Ankita Lokhande)विकीच्या जागी दुसरा कोणी पुरूष असता तर त्याने मला कधीच सोडलं असतं.पण त्याने माझी खूप साथ दिली.सुशांतसाठी जे चांगले आहे ते तू कर असे त्यावेळी तो म्हणाला होता."

स्टार प्लस वाहिणीवरील 'स्मार्ट जोडी' हा शो मार्चमधे सुरू झाला होता.लग्न झाल्यानंतर विकी आणि अंकिताने लगेचच यात भाग घेतला होता.(arjun Bijlani)त्यात अर्जून बिजलानी-नेहा स्वामी,भाग्यश्री-हिमालय दासानी,नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा,नताल्या इलिना-राहुल महाजन,पल्लवी शुक्ला-अंकित तिवारी या जोड्यांचाही समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com