Russia Ukraine Conflict:'पुतीन वाईट वाटतं, मी तुमची आई नाही' |Actress AnnaLynne Mccord poem viral new | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Russia Ukraine Conflict

Russia Ukraine Conflict:'पुतीन वाईट वाटतं, मी तुमची आई नाही'

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धानं आता जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अद्याप त्यांच्यातील वाद संपलेला नाही. दोन्ही (Putin) देशांनी चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र त्यापूर्वी मोठ्या (Hollywood News) प्रमाणावर हल्ले रशियाकडून करण्यात आले आहेत. यासगळ्यात जगभरातून मोठ्या प्रमाणात या घटनेची दखल घेण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी रशियावर टीका केली आहे. काहींनी त्यांच्या बाजूनं देखील भूमिका घेतली आहे. यासगळ्यात अमेरिकन अभिनेत्री (Annalynne Mccord) एन्लिन मॅकॉर्डच्या कवितेनं सेलिब्रेटींचे लक्ष वेधून घेतले आहे. तिनं त्या कवितेतून पुतीन यांच्याप्रती वेगळी भूमिका घेतल्यानं त्या अभिनेत्रीवरही टीका करण्यात आली आहे. तिनं चक्क (Social Media Viral) आपल्याला पुतीन यांची आई होता आले नाही याचे वाईट वाटत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे.

एन्लिननं आपल्या इॅमेजिन या कवितेतून रशिया आणि युक्रेनच्या युद्धाविषयी भाष्य केलं आहे. त्यांच्यासाठी तिनं केलेल्या कवितेतून सध्याच्या परिस्थितीविषयी अभिनेत्रीनं आपली भूमिका मांडली आहे. यापूर्वी तिच्या एका व्हिडिओमुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आपल्या नव्या व्हिडिओमध्ये म्हणते, मला हे माहिती आहे की, एखाद्या देशाचे हुकूमशहा होणे आणि नको असलेली गोष्ट आपण पुढे ढकलत राहणे हे काय असते. माझ्या आयुष्यातील काही गोष्टी जर वेगळ्या पद्धतीनं समोर आल्या असत्या तर आणखी आनंद वाटला असता. मात्र तसे काही झाले नाही. मी जर तुमच्या सारखी असते तर काय झाले असते, मी पण एक शक्तिशाली व्यक्ती झाले असते का, असा प्रश्न आहे. आपण अशाप्रकारे जो कारभार करता आहात त्याचे काय परिणाम होतील याचा विचार आपल्या देशातील विद्यार्थ्यांकडे पाहिल्यावर करायला हवा.

हेही वाचा: Viral: शबाना आझमींच्या भाचीसोबत कॅब चालकानं...

शिक्षण व्यवस्थेवर आताच्या युद्धाचे काय परिणाम होतील याकडे आपण गांभीर्यानं पाहायला हवं. मात्र तसे होत नाही. असं या अभिनेत्रीनं आपल्या नव्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यापूर्वी तिनं शेयर केलेल्या पोस्टमध्ये पुतीन मला वाईट वाटते की, मी तुमची आई नाही. त्या व्हिडिओची जोरदार चर्चा झाली होती. अभिनेत्रीच्या वेगळ्या भूमिकेमुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. सध्या हॉलीवूडमधील अनेक युक्रेनियन सेलिब्रेटींनी पुतीन यांच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये रेजिना स्पेकटोर, वेरा फार्मिंगा यांच्या नावाचा समावेश आहे.

Web Title: Actress Annalynne Mccord Poem Viral New Post Valdimir Putin Russia Ukraine War

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..