esakal | गरोदरपणात अनुष्काचं ट्रेडमिलवर जॉगिंग ; व्हिडिओ केला शेयर
sakal

बोलून बातमी शोधा

Anushka Sharma

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कायम चर्चेत राहणारे सेलिब्रेटी आहेत. सध्या विराटच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्यानं त्याची उत्सुकता दोघांच्याही चाहत्यांना आहे. यानिमित्तानं अनुष्का सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेयर करत असते. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.

गरोदरपणात अनुष्काचं ट्रेडमिलवर जॉगिंग ; व्हिडिओ केला शेयर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कायम चर्चेत राहणारे सेलिब्रेटी आहेत. सध्या विराटच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्यानं त्याची उत्सुकता दोघांच्याही चाहत्यांना आहे. यानिमित्तानं अनुष्का सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेयर करत असते. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वीही तिनं गरोदरपणात शीर्षासन केल्याची एक फोटो व्हायरल केला होता. त्यावरुन तिला टीकेलाही सामोरं जावं लागलं होत. आताही तिनं ट्रेडमिलवर धावतानाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. 

अनुष्कानं आपल्या प्रेग्नंसीच्या काळातील वेगवेगळ्या पध्दतीचं वर्कआऊट शेयर करुन चाहत्यांना दिलासा दिला आहे. त्या पोस्टला तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत. आपण जे वर्कआऊट करत आहोत ते पूर्णपणे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याचे अनुष्कानं सांगितले होते. गरोदरपणात ती करत असलेल्या अशाप्रकारच्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे थोड्याफार प्रमाणात टीकाही सहन करावी लागली होती. ट्रोलर्सनं केवळ अनुष्कालाच नव्हे तर विराटलाही अनेकदा टार्गेट केले आहे. मात्र या दोघांनीही त्याला फारसे महत्व न देता सोशल मीडियावर पोस्ट करणे सुरु ठेवले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनुष्का शर्मा लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. तिला आता नववा महिना सुरु असून गरोदरपणात स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनुष्का वर्कआउट आणि योगा करत आहे. मंगळवारी तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती ट्रेडमिलवर जॉगिंग करताना दिसतेय. या बूमरँग व्हिडिओत अनुष्काने व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक जेगिंग परिधान केले आहे. व्हिडिओत तिचे बेबी बंपही दिसत आहे.  यापूर्वी अनुष्काने योगा करतानाचा एक फोटो शेअर केला होता. यात ती पती विराट कोहलीच्या मदतीने शीर्षासन करताना दिसली होती.  

मुळशी पॅटर्न’ नंतर आता ‘जग्गु आणि Juliet’ ची उत्सुकता

अनुष्काचा शेवटचा चित्रपट झिरो हा होता. त्यात  शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. बाळाच्या जन्माच्या चार महिन्यांनी ती कामावर परतणार आहे. निर्माती म्हणून अनुष्काची 'पाताल लोक' ही वेब सीरिज लोकप्रिय झाली होती. याशिवाय तिने 'बुलबुल' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट 24 जून 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

Edited By - Prashant Patil

loading image