बाथरुममध्ये मारहाण, अभिनेत्री आरजु गोवित्रीकरचा घटस्फोटासाठी अर्ज

बॉलीवूडमध्ये (bollywood) सध्या वेगळं वारं वाहताना दिसत आहे.
arzoo govitrikar
arzoo govitrikar

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) सध्या वेगळं वारं वाहताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या संकटातून बॉलीवूड जात आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंग (yo yo honey singh) याच्या पत्नीनं त्याच्यावर कौटूंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. ते प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दुसरी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे अभिनेत्री आरजु गोवित्रीकरनं (arzoo govitrikar) पतीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. आपल्याला मारहाण करणं, मानसिक आणि शाररिक छळ करणं याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

सेलिब्रेटींमध्ये वादावादी झाल्याच्या घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतात. त्यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्यक्त करत असल्याचे दिसून येते. मात्र गेल्या आठवडाभरापासून त्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. असे सांगता येईल. याचे कारण म्हणजे यो यो हनी सिंगच्या पत्नीची तक्रार दुसरीकडे आरजुनं न्यायालयात घटस्फोटासाठी केलेला अर्ज. आरजुनं पती सिद्धार्थ सबरवालवर असा आरोप केला आहे की, त्यानं आपल्याला मारहाण केली. त्यामुळे आपल्याला त्याच्याकडून आता घटस्फोट हवा असल्याचं तिनं सांगितलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून आरजुची ओळख आहे. तिची मोठी बहिण आदिती गोवित्रीकर आहे. नागिन 2 मध्ये काम केल्यानंतर आरजुला ग्लॅमर मिळालं.

arzoo govitrikar
Happy Birthday Kajol: 'जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी'...
arzoo govitrikar
HBD जेनेलिया; खेळाडू ते मराठी अभिनेत्याची पत्नी...

2010 मध्ये आरजुनं सिद्धार्थ बरोबर लग्न केलं. काही वर्षांनी त्यांच्या नात्यात कटूता आली. सिद्धार्थ आपल्याला मारहाण करतो. असा आरोप तिनं केला आहे. याप्रकरणी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरजुनं दिलेल्या तक्रारीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, नशेत असताना सिद्धार्थनं तिला मारहाण केली. आरजुनं टीव्ही शो शिवाय तेलगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

आरजुनं सांगितलं, आता मी या सगळ्या प्रकाराबद्दल बोलुन थकले आहे. खूप काही सहनही केलं आहे. त्यामुळे मी माझ्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ते नातं टिकवण्यासाठी मी माझा आत्मसन्मान हरवला आहे. आणि तो आता मला पुन्हा मिळवायचा आहे. त्यासाठी माझी लढाई आहे. इ टाइम्सशी बोलताना तिनं सांगितलं, दोन वर्षानंतर ही गोष्ट मी समोर आणली आहे. त्यानं मला मारहाण केली आहे. जे आता सहन करण्याच्या पलीकडचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com