Ashvini Mahangade: तू टिकली लाव.. अश्विनीची महंगडेची ही पोस्ट बघाच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress Ashvini Mahangade shared post on her mother tikali  and bindi controversy

Ashvini Mahangade: तू टिकली लाव.. अश्विनीची महंगडेची ही पोस्ट बघाच..

स्वराज्यरक्षक संभाजी आणि आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं सतत काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या आई कुठे काय करते मालिकेतील 'अनघा' या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेच पण शिवाय वैयक्तिक आयुष्यातही ती सामाजिक कामात बरीच सक्रिय आज. शिवाय आपले अनुभव ती सोशल मिडियावरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असते. आज पुन्हा एकदा तिच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सध्या महाराष्ट्रात टिकली ही विषय चांगलाच गाजतोय. शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर टिकली हा विषय चर्चेत आला आहे. एका महिला पत्रकाराशी बोलण्यासाठी त्यांना आधी टिकली लाव मग तुझ्याशी बोलतो असं संभाजी भिडे यांचं वक्तव्य सध्या वादात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या वक्तव्याचा निषेध केला जातोय. अनेक जण यावर मत मांडत आहेत. त्यात अश्विनीनेही 'टिकली' वर एक पोस्ट लिहिली आहे, पण तिचे म्हणणे काही वेगळेच आहे. आपल्या आईसाठी तिने ही पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा: Sai Tamhankar: 'आयफा'सोहळ्यात सईचा मोठा अपमान! म्हणाली.. मला पाहून मिडियाने..

या पोस्ट मध्ये तिने लिहिले आहे ही, ''ठसठशीत टिकली लावणारी माझी मम्मी... काल साधारण नाना गेल्यानंतर दीड वर्षांनी ती घराबाहेर पडली. तिला कायम छान असे तयार व्हायला आवडायचे आणि काल मला सुद्धा वाटले की तिने आधीसारखे तयार व्हावे.

कदाचित '#लोक_काय_बोलतील' हा विचार जसा सगळ्यांच्याच मनात येतो तसा तिच्या सुद्धा मनात आला. पण माझ्याकडे पाहून तिने तो विचार #पुरला. ती आधीसारखीच गोड दिसत होती.. पण काहीतरी कमी होते. काय? तिचे कपाळ. या आधी मी खूप वेळा तिला म्हणाले की तू लाव #टिकली. तुला आवडते न.. मग. पण ती ऐकायची फक्त... ''

हेही वाचा: Jitendra Joshi:धुमाकूळ! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये जितेंद्र जोशीचा चौकार..

''आई कुठे काय करते मध्ये अनघा एकदा म्हणाली होती की लग्नाच्या आधी सुद्धा टिकली लावतोच की मग पती गेल्यानंतर ते बंद का करायचे...मी हा विचार सहज बोलले पण परत विचार केला की तिला असे सारखे टिकली लाव बोलणे योग्य नाही. तिला वाटले तर लावेल ती. आणि काल ती स्वतः म्हणाली, ताई..टिकली लावू का ग?''

आधी आणि आता सुद्धा आम्ही तिच्याकडून परवानगी घेतो आणि आज #लोक_काय_बोलतील या विचारात तिने मला विचारावे? मी क्षणात म्हणाले लाव की. त्यावर सज्जूने टिकली आणून दिली आणि माझी मम्मी पुन्हा एकदा देखणी, रुबाबदार आणि अगदी नानांना जशी आवडायची तशी दिसली.

''रुचिका (भावा) ने तिचे, आमचे मनसोक्त फोटो काढले आणि दीड वर्षानंतर आम्ही देवदर्शनासाठी बाहेर पडलो. काल आणखी एक अप्रतिम गोष्ट घडली. आम्ही आमच्या छकुली चा वाढदिवस साजरा केला. काल दीड वर्षानंतर पहिल्यांदा मम्मीने कुंकू हातात घेतले, छकुलीला ओवाळले. ही आमची सगळ्यात मोठी जीत आहे असे मी मानते.

शेवटी ती म्हणते, ''#लोक_काय_बोलतील यापेक्षा आता तिने तिला सांभाळावे, ज्यात खंड पडला त्या गोष्टी अनाहूतपणे होत असतील तर कराव्या. तिने आनंदी राहावे. #नाना देव होते आमच्या घराचे. ते कधी, कसे विसरता येईल. तुमच्या आईला थोडा विश्वास देण्याची गरज आहे, एकदा मिठी मारण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे आता आपण मोठे झालो आहोत तर कधीतरी त्यांचे लाड देखील करण्याची गरज आहे.'' तिच्या या विचारांनी वाचक चांगलेच प्रभावित झाले आहेत. तिच्या पोस्टवर भरभरून कमेंट्स येत आहेत.

टॅग्स :ashwini mahangade