रंगमंचावरील कामगारांसाठी अश्विनी भावे यांनी केली मोलाची मदत; कलाकारांनीही मानले आभार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 मे 2020

कोरोनाच्या संकटामुळे दोन महिन्यांपासून नाट्यसृष्टी बंद आहे. त्यावर अवलंबून असणाऱ्या रंगमंच कामगारांची रोजगार बुडाला आहे.  त्यामुळे हातावर पोट असलेल्या कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे दोन महिन्यांपासून नाट्यसृष्टी बंद आहे. त्यावर अवलंबून असणाऱ्या रंगमंच कामगारांची रोजगार बुडाला आहे.  त्यामुळे हातावर पोट असलेल्या कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यापासून या क्षेत्रातील कलाकार रंगमंच कामगारांना मदत करत आहेत. मराठी नाटक समूह कामगारांसाठी आर्थिक तसेच अन्नधान्याची सोय करत आहे. अभिनेत्री अश्विनी भावे यांनी देखील रंगमंच कामगारांना मदत म्हणून पाच लाख रुपयांची दिल्याची माहिती अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या 'प्रशांत दामले ऑफिशल फॅन पेज'वरुन दिली आहे. 

महत्वाची बातमी ः क्या बात! राज्यात एसटीची मालवाहतूक जोमात; एसटीचे 300 ट्रक सेवेत  

ते म्हणाले की, आजच्या काळात मदत ही संकल्पना म्हणजे माझा काय फायदा ? तो होणार असेल तर देईन अशी प्रवृत्ती असताना केवळ एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या उपक्रमावर आणि त्यातील व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवून आपली मदत योग्य त्या गरजू लोकांपर्यंत निश्चितच मिळेल या खात्रीने इतकी मोठी रक्कम देऊन उपक्रमाला पाठबळ देणं ही खरंच कौतुकाच्या पलीकडची गोष्ट आहे... आणि अशावेळी आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे याची आम्हाला जाणीव आहे, आणि आपण सर्व मिळून ती जबाबदारी नक्की निभावू हा विश्वास आहे.

महत्वाची बातमी ः पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती; वसईतील भालिवलीत मंदिरातील पुजाऱ्यांना मारहाण

एक हात आपुलकीचा, विश्वासाचा आपल्या माणसांना सावरण्याचा
मराठी नाटक समूहाच्या या प्रामाणिक उद्देशावर आणि केलेल्या मदतनिधीचा थेट विनियोग संबंधित गरजू रंगकर्मीनाच मिळेल, या विश्वासाने मराठी नाट्य, चित्रपट कलावंत अश्विनी भावे ह्यांनी मराठी नाटक समूहाच्या उपक्रमाला रुपये 5 लाख रुपयांची आर्थिक पाठबळ दिलेले आहे आणि यापुढेही पुढचे 3 महिने अशाच पद्धतीने मदत करण्याचे ठरवले आहे. म्हणजेच एकूण रुपये 20 लाख रुपयांची मदत करण्याचे मान्य केले आहे. त्यानिमित्त समस्त मराठी नाटक समूह आणि पडद्यामागील 200 कलाकारांनी अश्विनी भावे यांचे आभार मानल्याचे मराठी नाटक समूहाने कळवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress ashwini bhave gives five lakhs to the stage artist